सामान्य सर्दीसाठी करा हे घरगुती उपाय आणि मिळवा आराम; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता पावसाळा म्हटलं कि सर्दी पडसे असे आजार अगदीच सर्वसामान्य असतात. त्यामुळे सारखं सारखं डॉक्टर आणि मग तीच तीच कडू औषध, गोळ्या नाहीतर इंजेक्शन. मग या सगळ्यापासून पाल काढण्यासाठी आपण एकतर आजारी पडू नये म्हणून काळजी घेत असतो नाहीतर आजारी पडल्यावर दुर्लक्ष करतो. मग घराघरातील आई आणि आज्जी आपली शक्कल लढवतात आणि अगदी साध्या सोप्प्या घरगुती उपायांच्या माध्यमातून सर्दीसारख्या आजारांना पळता भुई थोडी करून टाकतात. अश्याच काही घरगुती उपायांची माहिती या लेखातून आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात सामान्य सर्दीसाठी आपण कोणते उपाय करू शकतो ते. खालीलप्रमाणे :-
१) सर्दीसारखे आजार हे हवामानातील बदल किंवा मग पाण्यातील विषाणूंमुळे होत असतात. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे सर्दी हि संसर्गजन्य आजारांपैकी एक आहे. यासाठी अगदी सोप्पा आणि घरच्या घरी करायचा सोप्पा उपाय म्हणजे, कोरड्या आणि चोंदलेल्या नाकासाठी साध्या क्षारयुक्त किंवा मीठ घातलेल्या पाण्याचे थेंब आपल्या नाकात घालावेत. यासाठी १/४ टेबलस्पून मीठ चार मिली पाण्यात घालून हे पाणी नीट ढवळावे आणि मग त्याचे २-२ थेंब नाकात घालावे. शिवाय थोड्या थोड्या दिवसांनी हे ताजे मिश्रण बनवावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. मुख्य म्हणजे स्वच्छ ड्रॉपरने रोज ३ ते ४ वेळा दोन्ही नाकपुड्यांमध्ये २ थेंब घालावेत. याचा लगेच परिणाम जाणवतो.
२) अति सर्दीमुळे नाक चोंदले असेल, श्वास घेणे अवघड झाले असेल तर अशावेळी लसणाचे तेल एका ओल्या लाल कांद्याच्या रसात मिसळून घ्या. हे मिश्रण एक कप पाण्यात मिसळा आणि ड्रॉपरच्या साहाय्याने त्याचे थेंब नाकात घाला.
३) सर्दीवर एकदम परिणामकारक तोड म्हणजे आलं. त्यामुळे आल्याचा चहा किंवा १ चमचा आल्याचा रस मधातून घेतल्यास फायदा होतो.
४) सर्दीवर हळदीचे दूधदेखील अत्यंत परिणामकारक असते. त्यामुळे कोमट दुधातून लहान अर्धा चमचा हळद व्यवस्थित मिसळून घ्यावी आणि रात्री झोपण्याआधी त्याचे सेवन करावे.
५) या शिवाय लिंबू, दालचिनी आणि मध यांचे मिश्रण सामान्य सर्दीसाठी एक प्रभावी औषध म्हणून वापरले जाते. यासाठी लिंबू, दालचिनी आणि मध यांचे मिश्रण करून सिरपप्रमाणे घ्यावे.