वाफारा घेण्याची योग्य पद्धत माहित करून घ्या आणि मिळवा लाभ; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाची सर येऊ लागली कि आपल्याला शारीरिक त्रास जाणवू लागतात. या त्रासात प्रामुख्याने अंगदुखी, कमकुवतपणा आणि ताप, सर्दी यांचा समावेश असतो. हे दिसायला लहान वाटणारे आजार आहेत मात्र हेच आजार पुढे कधी गंभीर होतात हेच कळत नाही. तर यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचे असते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपल्याला दैनंदिन आहारात विविध फळे आणि जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा लागतो. पण या आहारासोबत वाफारा यासोबतच वाफारा घेणे अर्थात सामान्य भाषेत वाफ घेणे अतिशय फायदेशीर ठरते. त्यामुळे रुग्णालयांमध्येही कोरोनापायी दाखल असणाऱ्या रूग्णांना वाफ दिली जाते. कारण खरोखरीच वाफ घेण्याचे खूप फायदे आहेत आणि तेच फायदे आणि वाफारा घेण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेणार आहोत.
१) वाफ घेण्याची योग्य पध्दत काय?
– वाफ घेण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात औषधी वनस्पती किंवा निलगिरीच्या तेलाचे काही थेंब घाला. त्यानंतर हे पाणी चांगले उकळवा. यानंतर डोक्यावर टॉवेल ठेवून वाफ घ्या. मात्र जर तुम्ही स्टीमर वाफ घेत असाल, तर हे काही करण्याची गरज पडणार नाही. शिवाय वाफ घेत असताना कोणाशीही बोलू नका.
२) वाफारा घेण्यासाठी त्यात कोणत्या गोष्टी घालत्याचा फायदा होतो?
– वाफ घेताना निलगिरीचे तेल वापरल्याने सर्दी आणि फुफ्फुसांच्या समस्यांपासून आराम मिळतो. यासाठी या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून वाफ घ्यावी. पण जर निलगिरीचे तेल तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही. लिंबू किंवा संत्र्याची साल, आले, दालचिनी, तेल किंवा कडुलिंबाची पाने देखील तुम्ही वाफाऱ्यासाठी वापरू शकता. शिवाय कार्व्होल प्लस कॅप्सूल पाण्यात टाकूनही वाफ घेतल्याने फायदा होतो.
३) वाफाऱ्याचे फायदे तरी काय?
– वाफाऱ्याने नाक आणि घसा लगेच मोकळा होतो. त्यात वाफ घेताना पाण्यात टाकलेले औषधी अँटीमाइक्रोबियल असतात. जे शरीरातील जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्यास अत्यंत लाभदायक असतात.
४) दिवसातून किती वेळा वाफारा घ्याल?
– डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रात्री झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर वाफ घेणे प्रभावी आहे. त्यावेळी शरीरात कफचा अधिक प्रादुर्भाव होतो. अशा परिस्थितीत, वाफ घेतल्याने घशात आणि फुफ्फुसात जमा झालेला कफ अगदी सहज बाहेर पडतो.
– याशिवाय दिवसातून एकदा साधारण १० ते २० मिनिटांसाठीही वाफ घेणे प्रभावी आहे.