गुलमोहराचे झाड फक्त सावलीच नव्हे तर आरोग्यही देते; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। उन्हाळ्याच्या दिवसात अत्यंत सुंदर अश्या लाल फुलांनी बहरलेले एक झाड दिसते. जे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेण्यास सक्षम असते. हे झाड म्हणजे गुलमोहर. गुलमोहराची झाड आपल्याला सावली देते आणि उत्साहदेखील देते. पण तुम्हाला हे माहित आहे का? कि गुलमोहराचे झाड निसर्गाचे सौंदर्य वाढविण्यासह आणि आपल्याला सावली देण्याव्यतिरिक्त आरोग्याशी संबंधित अनेको फायदे देते. होय. तुम्ही या अगदी बरोबर वाचताय. गुलमोहराची झाड हे लोकोपयोगी झाड असून आरोग्य देणारे आहे. इतकेच काय तर गुलमोहराच्या झाडापासून बनविल्या जाणाऱ्या औषधांचा उल्लेख आयुर्वेदातही करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊयात गुलमोहराचे आरोग्याशी संबंधित फायदे कोणते ते खालीलप्रमाणे:-
१) मधुमेहावर नियंत्रण – गुलमोहरात मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी वा नियंत्रित करता येते. गुलमोहराच्या मेथनॉल अर्काचा वापर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण करण्यासाठी गुलमोहर प्रभावी आहे. यासाठी गुलमोहराच्या काड्यांची पावडर उपयोगी असते.
२) अतिसारावर परिणामकारक – आजकाल बदलती खानपान पद्धती यामूळे अपचनाच्या समस्या उदभवू लागल्या आहेत. जर तुम्हीही अश्या समस्येने ग्रस्त असाल तर अतिसार काढून टाकण्यासाठी गुलमोहर झाडाच्या खोडाची साल सुकवून त्याची पावडर तुम्ही वापरू शकता. याचा पोटाशी संबंधित विकारांवर अतिशय प्रभाव पडतो आणि या समस्यांपासून आराम मिळतो.
३) सांधेदुखीपासून आराम – पिवळ्या रंगाच्या गुलमोहराची पाने बारीक वाटून सांध्यांवर लावल्याने सांधेदुखीच्या वेदनापासून आराम मिळतो. हा उपाय आठवड्यातून ३ वेळा वापरल्यास सांधेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते.
४) तोंडाच्या समस्यांवर गुणकारी – जर तुम्ही तोंडामधील अल्सरमूळे त्रासात असाल तर गुलमोहर तुमची या समस्यांतून सुटका करू शकते. कारण तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी गुलमोहरचा वापर परिणामकारक मानला जातो. यासाठी गुलमोहर झाडाच्या खोडाची साल काढून सुकवून त्याची पावडर तयार करा आणि या पावडरमध्ये मध मिसळून खा. यामुळे लवकर आराम मिळेल.
५) मासिक पाळीच्या त्रासांवर प्रभावी – मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना ओटीपोटात आणि पाठीत प्रचंड वेदना जाणवतात. यासाठी गुलमोहराच्या फुलांचा वापर या वेदना दूर करण्यास मदत करतो. यासाठी गुलमोहराची फुले वाटून त्यात मध मिसळून खा किंवा गुलमोहराच्या पानांची बारीक पावडर मधात मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे मासिक पाळीच्या त्रासापासून मुक्त होण्यास मदत मिळते.
६) केसगळती करेल दूर – आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे केसगळतीची समस्या अनेको लोकांमध्ये दिसून येत आहे. प्रामुख्याने स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हालाही केसगळतीची समस्या असेल तर गुलमोहराची पाने बारीक करून पावडर बनवा आणि नंतर ती कोमट पाण्यात मिसळून टाळूवर लावा. या उपायाचा वापर नियमितपणे केल्यास केसगळतीची समस्या दूर होते.