ब्रेस्ट कॅन्सरविषयी ‘या’ गोष्टी महिलांना माहित असणे अत्यंत आवश्यक; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। कॅन्सर हा एक असा रोग आहे, ज्यात विविध प्रकार असून तो कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो. या रोगाचे निदान वेळीच झाले असता यावर असे अनेको उपचार आहेत जे त्यावर मात करण्यास सक्षम आहेत. रिपोर्टनुसार, यावर्षी भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या १३.९ लाख असल्याचा अंदाज आहे. तर २०२५ पर्यंत ती १५.७ लाखांपर्यंत वाढू शकते. तर देशात स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि तोंडाचा सामान्य कर्करोग हे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरले आहे.
स्वयं तपासणीने स्तनाचा कर्करोग लवकर कळू शकतो. यासाठी सोनोग्राफी हे महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. याने पोटातील कर्करोगदेखील लवकर कळून येतो. इतर अवयवांच्या कर्करोगांसाठी मात्र लक्षणांवरून अनुमान करणे व त्वरित तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक असते. अनेक स्त्रिया स्तनाच्या कर्करोगाबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे संभ्रमित असतात. यामुळे अनेकांना रोगाच्या स्थितीची कल्पनाही येत नाही. परिणामी हा आजार मोठा होऊन गिळंकृत करू पाहतो. म्हणून आपल्याला स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. शिवाय याबाबत आपण जाणकार असल्यास त्यातून मुक्तता मिळवणे सोप्पे असते.
१) दैनंदिन जीवनात बदल – स्तनाचा कर्करोग असल्यास आपण सक्षमपणे या आजाराशी लढणे आवश्यक आहे. यासाठी आपण निरोगी दिनचर्येचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपल्या दिनचर्येत शरीरासाठी नुकसानदायी ठरणारे कार्य करणे टाळावे. आपल्या दैनंदिन कामात हितवर्धक बदल करावा ज्याचा शरीरास फायदा होईल.
२) मद्यपान व धुम्रपान करू नये – दारू प्यायल्याने आणि धुम्रपान केल्याने स्तनाचा कर्करोग वाढतो. यामुळे दारू पिणे आणि धुम्रपान करणे दोन्हीही सवयीनवर वेळीच रोख लावा. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
३) संतुलित आहार – आपल्याला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यास आपण संतुलित आहार घेण्यास सुरुवात करणे फार महत्वाचे आहे. जेव्हा आपण केमोथेरपी किंवा रेडिएशनद्वारे जाता तेव्हा आपले शरीर कमकुवत होते आणि नंतर आपल्याला संतुलित आहाराची आवश्यकता असते जेणेकरून आपले शरीर या भयानक आजाराशी लढा देऊ शकेल.
४) सावधगिरी – स्तनाच्या कर्करोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. यासाठी केमोथेरपी किंवा रेडिएशन या प्रक्रिया उपलब्ध आहेत. परंतु याकरिता आपल्याला डॉक्टरकडे जाऊन योग्य तपासणी करून त्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर, पुन्हा स्तन कर्करोग होऊ नये म्हणून ५ ते १० वर्ष औषधे खाण्याची देखील आवश्यकता असते.
५) उपचाराचा खर्च
– स्तन कर्करोगाच्या उपचारासाठी बराच खर्च करावा लागतो. यासाठी आपल्याकडे हेल्थ कवर असेल तरीही अधिक पैसे लागू शकतात. कारण औषधाची किंमत तसेच शस्त्रक्रिया, रेडिएशन यांची किंमत जास्त आहे. मात्र यामुळे दुर्लक्ष करणे योग्य नाही. यासाठी काही संस्था मदत करतात आणि सरकारच्या योजनाही लाभदायक ठरतात. याबाबत तपासणी केंद्रात चौकशी करावी.