ब्रेकफास्टमध्ये कॉर्नफ्लेक्स असेल तर शारीरिक कार्यात येईल गती; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। कॉर्नफ्लेक्स हा असा नाश्ता आहे जो अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातात. शिवाय हा नाश्त्यासाठी अत्यंत सोयीस्कर आणि उत्तम असा एक पर्याय आहे. शिवाय नाश्त्यासाठी कॉर्नफ्लेक्स खाताना गरम किंवा थंड दुधात मिसळून खाणे याचा आनंद काही वेगळाच आहे. या पदार्थाची चव गोड असते. शिवाय हे अनेक पोषक तत्वांनी समृद्धदेखील असते.
कॉर्नफ्लेक्समध्ये शरीरोपयोगी खनिजे, जीवनसत्त्वे, आहारातील फायबर, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीरिक कार्यक्षमतेस चालना मिळते. परिणामी दिवस उत्साही जातो. चला तर सकाळच्या नाश्त्यात कॉर्नफ्लेक्स खाण्याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊयात. खालीलप्रमाणे:-
१) भरपूर प्रथिने – दूध आणि कॉर्नफ्लेक्स हे प्रथिने मिळवण्यासाठी एकदम उत्तम असे कॉम्बिनेशन आहे. हे एकत्र खाल्ल्यामूळे शरीर दिवसभर उत्साही अर्थात ऍक्टिव्ह राहते. शिवाय यातील प्रथिने प्रतिकारशक्तीही वाढवतात. तसेच कॉर्नफ्लेक्ससोबत दुधासह, बदाम खाल्ल्याने प्रोटीनचे प्रमाण वाढू शकते.
२) फुफ्फुसांचे सुधारित आरोग्य – कॉर्न अर्थात मक्यामध्ये कॅरोटीनोईड्स असतात. ज्यांना बीटा-क्रिप्टोक्सॅन्थिन असे म्हणतात. असे मानले जाते की हे आपल्या फुफ्फुसाच्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. इतकेच नव्हे तर एका संशोधनानुसार, कॉर्नफ्लेक्सचे सेवन केल्याने फुफ्फुसांचा कर्करोगही टाळता येतो.
३) पाचन तंत्रास फायदेशीर – कॉर्नफ्लेक्समध्ये उच्च प्रमाणात फायबर उपलब्ध असते. जे आपल्या पाचन तंत्रासाठी अतिशय चांगले मानले जाते. शिवाय, कॉर्नफ्लेक्सचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि इतर सामान्य पाचन समस्या टाळणे सोप्पे होते.
४) कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण – कॉर्नफ्लेक्स इतर कोणत्याही फॅटी फूडपेक्षा निश्चितच स्वस्थ असे फूड आहे. कारण कोर्नफ्लेक्समध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे हृदयरोगग्रस्तांसाठी कॉर्नफ्लेक्स आणि दूध हा उत्तम नाश्ता आहे. शिवाय ते पचायलाही खूप हलके असते.
५) वजन कमी करण्यास मदतयुक्त – वजन कमी करण्यासाठी कॉर्नफ्लेक्स उत्तम नाश्ता आहे. कारण यात कॅलरीज कमी असतात. यासाठी रोज सकाळी १ वाटी कॉर्नफ्लेक्स व दुध एकत्र खाणे भूकेवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कॉर्नफ्लेक्स उत्तम पर्याय आहेत. मात्र, कॉर्नफ्लेक्समध्ये साखर घालणे टाळा. साखरेला पर्याय म्हणून तुम्ही फळांचा वापर करू शकता.
६) शरीरातील लोहाचे प्रमाण सुधारते – आपल्या शरीरातील रक्ताची मात्रा योग्य राहण्यासाठी शरीरात लोहाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. यासाठी कॉर्नफ्लेक्स हा लोह समृद्ध आहार घेऊन शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित करता येईल.
७) डोळ्यांसाठी फायदेशीर – कॉर्नफ्लेक्समध्ये व्हिटॅमिन ए, नियासिन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी १२, ल्यूटिन हे सर्व पोषक घटक समाविष्ट असतात. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी कॉर्नफ्लेक्स मदतयुक्त आहार ठरते.