पार्टीसाठी तयार व्हायचंय? मग ह्या टिप्स जरूर वापरा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले सौंदर्य इतर कुणाहीपेक्षा वरचढ असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे एखाद्या खास प्रसंगी जायचं असेल तर मुली आपल्या लूक आणि मेकअपवर फार लक्ष देतात. पण बऱ्याचदा असे होते कि, दैनंदिन जीवनात अनेक मुलींना मेकअप करण्याची सवय नसते. मग या मुलींची मात्र तारांबळ उडते. अश्या प्रत्येक मुलींसाठी हा आजचा लेख. यामध्ये आज आपण अश्या काही मेकअप टिप्सची माहिती घेणार आहोत, कि ह्यांचा वापर केला असता पार्टी असो नाहीतर लग्न सोहळा तुमची त्वचा नक्की ग्लो करणार.
जाणून घ्या मेकअपच्या खास टिप्स खालीलप्रमाणे :-
१) मेकअपच्या बेससाठी शीयर फाऊंडेशन वापरा. यामुळे मेकअपला एक शायनिंग लूक मिळतो आणि आपण केलेला मेकअप बराच काळ टिकतो.
२) आपल्या त्वचेचा रंग पाहून शेड्स वापराव्या. भारतीय वर्ण हा कृष्णवर्ण आहे त्यामुळे बऱ्याचदा स्किनटोनला पेल शेड्स मॅच होत नाहीत. त्यामुळे लाईट कलरपेक्षा एक शेड डार्क टोन निवडा. सर्वसाधारणपणे पिंकीश मॉव कलर सगळ्या स्किनटोनवर मॅच होतो. त्यामुळे हा शेड वापरावा.
३) विशेषत: आयलाईनर वापरताना चालू ट्रेंडनुसार डोळ्यांच्या कोपर्यातून थोडा बाहेर सोडा. यामुळे दिसताना डोळे रेखीव आणि सुंदर दिसतात.
४) आपण केलेल्या पेहरावाच्या रंगाशी मिळतीजुळती आयश्ॉडो निवडा. साधारणत: लाईट ब्ल्यू, पिंक आणि ग्रीन या शेड्स सर्व प्रकारच्या स्किनटोनवर अगदी सहज मॅच होतात. शक्यतो लाईट रंगाचे आयशॅडो वापरा आणि कॉर्नर बॉर्डर गडद ठेवा.
५) आयलाईनर, मस्कारा आणि काजळ यांमुळे डोळ्यांची आकर्षकता वाढते. त्यामुळे आय मेकअपसाठी या तिन्ही स्टेप्स आवश्यक आहेत.
६) केस मोकळे सोडायचे असतील तर स्ट्रेटनिंगचा पर्याय तुम्ही वापरू शकता. यामुळे केसांना आपोआपच एक छानसा मॉडर्न लूक मिळतो. शिवाय क्रिंपिंग, रोलर किंवा मग ड्रायर सेटिंगमुळेसुद्धा केसांना स्टायलिश लूक देता येतो. सध्या लेयर्स आणि रेजर या फॅशन टट्रेंडिंगमध्ये आहेत.