मिठाविना उपवास करताय मग या परिणामांना सामोरे जायला तयार व्हा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्याला विशेष असे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे धर्माच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण काळ अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यापासून पुढील ४ महिने अत्यंत पवित्र असतात, याना ‘चातुर्मास’ म्हणून ओळखले जाते. या ४ महिन्यांत अनेक लोक आपला वेळ भक्तीत आणि उपासनेत घालवतात.
दरम्यान अनेक लोक लसूण, कांदा, बटाटा आणि हिरव्या भाज्या सोडून इतर सर्व भाज्या खातात. मुळात हि बाब आरोग्य आणि धार्मिक अश्या दोन्ही दृष्टीकोनातून फलदायी आहे. परंतु या दरम्यान लोक मीठ देखील खाणे सोडून देतात. जे आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. निश्चितच मीठ अधिक खाणे शरीरासाठी हानिकारक आहे. परंतु मीठ न खाणे त्याहूनही अधिक हानी पोहचवू शकते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया मीठ खाणे सोडल्यामुळे आपल्याला कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल.
– मीठात सोडियमची मात्र अधिक असते आणि हा सर्वात महत्वाचा घटक आहे. शिवाय मिठातील इलेक्ट्रोलाइट देखील आरोग्यासाठी आवश्यक असते. निश्चितच जास्त प्रमाणात मीठ खाणे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण करते. परंतु, कमी किंवा मीठ खाल्लेच नाही तर शरीर कमकुवत होऊ लागते. मिठाचे सेवन टाळल्यामुळे शरीराच्या आरोग्यावर होणारे परिणाम खालीलप्रमाणे:-
१) मिठाचे सेवन टाळल्यास रक्तातील साखरेच्या पातळीत चढ – उतार होते. शिवाय मीठ न खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो आणि त्यानंतर शारीरिक अशक्तपणा जाणवतो.
२) एका संशोधनानुसार, मीठ न खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो. एनसीबीआयच्या अभ्यासानुसार, २३०० मिलीग्रामपेक्षा कमी किंवा जास्त मीठ खाणे शरीरास हानी पोहचवते. त्यामुळे आहारात मिठाचे प्रमाण सीमित असावे.
३) मुख्य बाब अशी कि, मधुमेहींनी उपवास करणे धोकादायक आहे. त्यात मीठ न खाणे म्हणजे आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. कारण शरीरातील मीठाच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. मात्र, मधुमेह प्रकार १ आणि प्रकार २’ने ग्रासलेल्या रुग्णांनी कमी प्रमाणात सोडियमचे सेवन केले पाहिजे, म्हणून मीठ खावे परंतु त्याचे प्रमाण कमी असावे. तथापि यावर अजूनहि आहारतज्ञ अभ्यास करीत आहेत.