चहा अधिक हेल्दी बनवायचा असेल तर असा बनवा; लगेच जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या देशात न जाणे कित्येक लोक चहाप्रेमी आहेत. सकाळ असो किंवा मग रात्र चहाविना जगणे जणू कठीणच, अश्या स्वभावाचे हे लोक असतात आणि तशी आपल्याकडे चहा खानपान योजनेतील एक संस्कृतीच आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना आदरातिथ्य करीत पाहुणचार म्हणून चहा दिला जातो. त्यामुळे चहाला असेही आणि तसेही एक विशेष महत्व आहे. मात्र तज्ञ म्हणतात कि, जर चहा जास्त उकळला तर आरोग्याचे नुकसान होते. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही अशा सोप्प्या पद्धती सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा आवडता चहा नुसता चविष्ट नाही तर एकदम हेल्दी होईल. शिवाय आरोग्यासही अतिशय लाभ होईल.
१) चहापत्ती चांगल्या दर्जाची वापरा – चहाचा स्वाद त्यात घातलेल्या चहापत्ती किंवा चहा पावडरमुळे असतो. त्यामुळे जर खराब किंवा विनाखात्रीची चहापत्ती वापरलं तर चहाची चव वाईट लागेलच. शिवाय आरोग्याचेही नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२) चहा जास्त उकळवू नका – याचे कारण असे कि, चहा जास्त उकळल्याने अॅसिडिटी व इतर समस्या उफ़ाळतात आणि मग त्रास होतो. पण समजा कधिउ चहा जास्त उकळलाच तर त्यात एक चमचा मध घाला आणि व्यवस्थित मिसळून मग चहा प्या.
३) चहामध्ये पॅकेटवजी नैसर्गिक दुधाचा वापर करा – आजकाल अगदी साधा सोप्पा पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध असणारे सील पॅकेटमधील दुधाचा वापर चहासाठी केला जातो. मात्र अनेकदा हे पॅकेट एक्सपायरी डेट न पाहिल्याने असेच वापरले जाते आणि मग याचा त्रास होतो. शिवाय हे पॅकेट्स कागदाचे असल्यामुळे त्याचा वाशी दुधाला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे पॅकेटऐवजी नैसर्गिक दूध निवडल्यास चहाची चव चांगली होईल आणि आरोग्यास होणार धोकाही टळेल.
४) साखरेचा वापर टाळा – साखरेचे अति सेवन आरोग्यास गंभीर समस्यांकडे नेण्यास कारणीभूत असते. त्यामुळे आहार तज्ञ सांगतात, चहामध्ये साखरेचा वापर न करणे चहाला हेल्दी बनवितात. मात्र गोडाशिवाय चहा जात नसेल तर साखरेऐवजी गुळ वापरणे आरोग्यास अगदी उत्तम आहे.
५) चहामध्ये खड्या मसाल्यांचा वापर करा – चहा उकळत असताना त्यात लवंग, वेलची, आले – सुंठ, दालचिनी, तुळस किंवा केसर घालून हलके २ मिनिटांपर्यंत उकळवा किंवा आधी पाण्यात हे मसाले उकळून मग चहापत्ती घाला. यामुळे चहा अगदी आयुर्वेदिक चहाचे स्वरूप धारण करतो जो आपल्या आरोग्यासाठी १००% हेल्दी असतो.
६) तुळसयुक्त चहा – चहात असणारे कॅफीन हे अॅसिडिक असते. जे आपली झोप उडविते आणि झोप न येणे किंवा तुटणे हे शरीरासाठी चांगले नसते. त्यामुळे चहातील कॅफीनपासून बचाव करण्यासाठी चहात ५ ते ७ तुळशीची पाने हाताने तोडून घाला आणि तुळसयुक्त चहा प्या. यामुळे चहातील कॅफिन शरीरावर गंभीर परिणाम करणार नाही.
७) रिकाम्यापोटी चहा पिऊ नये – तज्ञ सांगतात रिकाम्यापोटी चहा पिऊ नये. यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होण्याची दाट शक्यता असते. यामुळे पित्त देखील उसळते. मळमळणे, उलट्या होणे असेही त्रास संभवतात. त्यामुळे सकाळी काहीतरी खा आणि नंतरच चहा प्या.