फॅशन म्हणून कान टोचले आणि आता त्रास होतोय..? तर करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण खूप लहान असताना आपले कान शास्त्रोत्र शुद्ध पद्धतीने टोचले जातात. यानंतर आपले आई बाबा छानशी बाली आपल्या कानात घालतात. साधारण मोठे होईपर्यंत आपण हेच कानातले अगदी लाडाने आणि कौतुकाने मिरवतो. पण यानंतर मात्र तरुणाईचे वेड भलत्याच दिशेकडे ओढत नेते. अर्थात सांगायचे असे कि बाळ लहान असतानाच त्याचे कान टोचले जातात मात्र, सध्याच फॅशन म्हणून एकापेक्षा जास्त ठिकाणी कान टोचून घेण्याची नवीच प्रथा लागू झाली आहे.
या प्रकारात वयाचे कोणतेही बंधन नाही. तुमचे वय काहीही असो तुम्ही कधीही कान टोचू शकता. मुख्य म्हणजे एकापेक्षा अनेक ठिकाणी कान टोचून घेतले जातात आणि याचा नंतर त्रास जाणवतो. त्यामुळे जर तुम्हीही अश्या फॅशनपायी नव्याने कान टोचले असतील आणि आता तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर वेळीच हि काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. जाणून घ्या कान टोचल्यानंतर आपल्या कानांची कशी काळजी घ्यावी? खालीलप्रमाणे:-
१) अनेकांना कान टोचल्यानंतर वारंवार कानाला हात लावायची सवय असते. मात्र, कान टोचल्यानंतर सतत कानाला हात लावू नका. त्यामुळे कानला ठणका लागण्याची शक्यता असते.
२) कान टोचल्यानंतर सतत दुखत असेल किंवा सुजला असेल तर कान टोचलेल्या ठिकाणी हळद व तेलाचा हलक्या हाताने लेप लावा. यासाठी चमचाभर हळद आणि त्यात पेस्ट होण्याइतपत नारळाचे तेल घालावे आणि हा लेप वापरावा. यामुळे कान दुखणे आणि ठणका बसणे थांबेल.
३) नव्याने कान टोचले असतील तर प्रामुख्याने स्विमिंग करून नये. कारण, स्विमिंग पूलमध्ये क्लोरिनयुक्त पाण्याचा समावेश असतो. या पाण्यामुळे त्वचेला इजा पोहोचते.
४) नुकतेच कान टोचले असतील कोणतेही जुने कानातले घालताना ते स्वच्छ निर्जंतूक करुन घ्या किंवा ते वापरणे टाळा.
५) कानाल सूज आली असल्यास गरम पाण्याने कानाला शेक द्यावा. यामुळे कां दुखणे कमी होते.
६) झोपण्यापूर्वी कानातले काढून झोपा, यामुळे कानाला आराम मिळेल.
७) कान टोचल्यावर कानात घातलेले रिंग दिवसातून किमान दोनवेळा हलक्या हाताने फिरवा. कारण जर रिंग फिरवली नाही तर ती एकाच जागी अडकू शकते. ज्यामुळे कान टोचलेल्या ठिकाणी जखम होण्याची शक्यता बळावते.