वारंवार भूक लागणे असू शकते ‘या’ आजाराचे कारण; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि, आपले पोट भरलेले असते आणि तरीही आपल्याला काही ना काही खवास वाटत. हि भावना इतकी तीव्र असते कि आपण स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही. मग एकतर आपण ड्राय फ्रुट्स, खाकरा, बिस्किट्स, चिप्स खातो. नाहीतर फ्रिजमध्ये चुकून उरलेला केक, पेस्ट्री किंवा अन्य कोणतातरी खाण्यायोग्य पदार्थ खातो. हे असेच अख्खा दिवस चालू राहते पण तरीही भूक काही मिटत नाही हि फारच गंभीर बाब आहे.
मुख्य म्हणजे, जर तुम्ही जिममध्ये खुप वर्कआऊट करत असाल, खुप जास्त धावण्याचा सराव करत असाल किंवा गर्भवती महीला असेल तर सतत भूक लागणे स्वाभाविक आहे. परंतु कारण नसताना जर तुम्हाला सारखी भूक लागत असेल तर मात्र हा विषय गंभीर असू शकतो. हा कदाचित एखादा आजार असण्याची शक्यता आहे ज्याला वैज्ञानिक भाषेत ‘हायपरफेजिया’ वा ‘पॉलीफेजिया’ म्हणून ओळखतात. चला तर या आजाराची करणे जाणून घेऊयात खालीलप्रमाणे
१) अधिक ताणामुळे मेंदूमध्ये कॉर्टिकोट्रॉपिन-रिलीज हॉर्मोन्स व अड्रेनालाइन याची निर्मिती होत असते. ज्यामुळे भूक लागण्याचे प्रमाण वाढते. शिवाय ताण कायम राहील्यास अड्रेनल ग्रंथी कॉर्टिसोल हे हॉर्मोन बाहेर टाकते ज्यामुळे भूकेचे प्रमाण अधिकच वाढते. तसेच जरा हा ताण दिर्घकाळापर्यंत राहीला तर भूक लागण्याचे प्रमाण केवळ वाढत राहते.
२) बायपोलर किंवा मॅनिक डिप्रेशन या मनोविकारांमध्ये मेंदूतले केमिकल्स असंतुलित होतात ज्यामुळे भूक जास्त लागते.
३) कधीकधी हॉर्मोन्सची कमतरता व जेनेटीक घटकांमुळे देखील भुकेचे वाढ ते.
४) ब्लूयेमिया या खाण्याच्या विकारामुळे देखील भुकेचे प्रमाण वाढते. यामुळे खाण्यावर नियंत्रण राहत नाही आणि दोन तासांच्या आत सतत भूक लागते.
५) जंत झाले असतील तरीही भूक जास्त लागते. कारण टेपवर्म हे जंत दिर्घ काळ पोटात राहतात आणि शरीरातील आवश्यक पोषक मुल्यांवर जगतात. यामुळे शरीराला फक्त साखर व फॅट्स मिळतात. परिणामी अपु-या पोषणामुळे वारंवार भूक लागते.
६) मधूमेह प्रकार २ यामुळेही वारंवार भूक लागते. रक्तातील साखर कमी झाल्यामुळे भूक लागते. मात्र रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानेही वारंवार भूक लागते कारण यावेळी शरीरातील प्रत्येक पेशी रक्तातील साखर मिळवण्यासाठी इन्सूलीनवर अवलंबून असतात.
७) काही औषधांमुळेदेखील भूक लागते. यात कॉर्टिकोस्टेरॉईड, साइप्रोहेप्टीडीन, ट्रायसिलीक अॅन्टी डिस्प्रेटंट या औषधांचा समावेश आहे.
८) पीएमएस या मासिक पाळीच्या समस्येतही भूकेचे प्रमाण वाढते. मासिक पाळीआधी ते मासिक पाळीनंतर किमान २ दिवस ही समस्या निर्माण होते.