| |

‘या’ पदार्थांचे अतिसेवन शरीरात कफ निर्माण करण्यास ठरते कारणीभूत; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। शरीरात कफ जमा झाल्यामुळे श्वसन इंद्रियांवर त्याचा परिणाम गंभीर होतो. कफ जमा झाल्यामुळे श्वासोच्छ्वासास अडसर निर्माण होतो. मुळात धूळीचे कण, बॅक्टेरिया, तेलकट – अतितिखट पदार्थ आणि सर्दी पडसे यामुळे कफ हि समस्या उदभवते. जर व्यक्तीच्या शरीरात कफ वाढीस लागला, तर त्याला अनेक समस्या येतात. या समस्या अश्या कि, कफमुळे रुग्णाला श्वास घेण्यास अतिशय त्रास होतो. यामुळे काहींना धाप लागणे, शारीरिक कमकुवतपणादेखील जाणवतो. यासह सतत खोकला आणि नाक वाहण्याची समस्या देखील उद्भवते. इतकेच नव्हे तर अर्धशिशी आणि पूर्ण डोकेदुखी, डोळे दुखण्याची समस्या देखील उदभवते. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कोरोना विषाणू प्रथम या श्वसन प्रणालीवर हल्ला करतात. ज्यामुळे शरीराची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी आपल्या रोजच्या आहारात असणारे काही पदार्थ वगळल्यास फायदा होतो. काही पदार्थांच्या अतिसेवनामुळे कफ वाढतो. जाणून घ्या खालील प्रमाणे:-

१) फळं आणि भाज्या
– यात काहीच असत्य नाही कि, फळं आणि भाज्यांमध्ये पोषक घटक नैसर्गिकरित्या समाविष्ट असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. परंतु यापैकी काही पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणे आपल्या शरीरासाठी योग्य आहे. यात प्रामुख्याने – बटाटे, कोबी, केळी, मका आणि मक्याची उत्पादने यांचा समावेश होतो. या पदार्थांच्या सेवनामुळे आपल्या फुफ्फुसातील कफचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते.

 

२) ब्रेकफास्टवेळी खाल्ले जाणारे पदार्थ
– ब्रेकफास्टमध्ये प्रामुख्याने खाल्ले जाणारे अन्न पदार्थ जसे कि – ब्रेड, पास्ता, तृणधान्ये, अंडी, दही, लोणी, चीज आणि आइस्क्रीम देखील फुफ्फुसातील कफचे प्रमाण वेगाने वाढवतात. म्हणून, आपण त्यांचे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे.

 

३) पेय पदार्थ/ द्रव्य पदार्थ
– कफ वाढवण्याच्या दृष्टीने काही पेय पदार्थ आपल्या शरीरासाठी धोकादायक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये प्रामुख्याने चहा, कॉफी, सोडा आणि अल्कोहोल यांचे सेवन जास्त प्रमाणात करणे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने घातक मानले जाते. ही सर्व पेय शरीरातील कफ वाढविण्यास कारणीभूत आहेत. इतकेच नव्हे तर हे पदार्थ आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्तीदेखील कमी करतात. परिणामी कोणत्याही संसर्गाचे विषाणूं अगदी सहजरित्या आपल्या शरीरात समावेश करतात आणि संक्रमणाचा धोका वाढतो.