आर्टिफिशियल ज्वेलरीच्या वापराने त्वचेच्या समस्या का होतात?; जाणून घ्या कारण, परिणाम आणि उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आर्टिफिशियल ज्वेलरी हि खऱ्या खुऱ्या दागिन्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. या ज्वेलरीज अगदी ट्रेंडिंग, फॅशनेबल आणि दिसायला खूपच आकर्षक असतात. त्यामुळे अनेको स्त्रिया आर्टिफिशियल ज्वेलरीला विशेष पसंती दर्शवितात. सध्या मार्केटमध्येही आर्टिफीशियल ज्वेलरीचे भलतेच क्रेझ आहे. पण आर्टिफिशियल ज्वेलरी रोज वापराने त्वचेच्या आरोग्यासाठी समस्या निर्माण करतात. अंगावर सूज येणे, रॅशेज उठणे, रक्ताच्या किंवा मांसाच्या गाठी होणे, ड्राय पॅच पडणे अशा समस्या आर्टिफिशियल ज्वेलरी वापरल्याने होतात. म्हणूच रोज आर्टिफिशियल ज्वलेरी वापरणे धोक्याचे आहे. चला तर जाणून घेऊयात आर्टिफिशियल ज्वेलरीच्या वापराने त्वचेच्या समस्या का उदभवतात? आणि या समस्यांवर काय उपाय करावे? खालीलप्रमाणे :-
० आर्टिफिशियल ज्वेलरीच्या वापराने त्वचेच्या समस्या का होतात?
– अनेकांना मेट्लशी एलर्जी असते आणि आर्टिफिशियल ज्वेलरी निकलसारख्या धातूंपासून बनवतात. त्यामुळे रोगप्रतिराकशक्तीदेखील एलर्जीसोबत लढू शकत नाही. परिणामी इन्फेक्शन होते. याशिवाय एकदा त्वचेवर या ज्वेलरीमूळे रिएक्शन झाले असेल, तर नंतर जेव्हाही असे दागिने पुन्हा वापरल्याने एलर्जी होते. शिवाय हे दागिने ओले झाल्यानेही त्वचेला त्रास होतो. हे दागिने घातल्यानंतर २४ ते ४८ तासांत ॲलर्जीक रिएक्शन दिसते आणि हा त्रास २ ते ४ आठवडे टिकू शकतो.
० आर्टिफिशियल ज्वेलरीमुळे त्वचेला समस्यांचा सामना करावा लागतो?
१) त्वचेवर सूज येणे – आर्टिफिशियल ज्वेलरीच्या वापरामुळे त्वचेवर जळजळ होते आणि त्या भागावर सूज चढते. यावर बर्फानं शेक दिल्याने वेदना कमी होतात.
२) त्वचेवर रॅशेज येणे – आर्टिफिशीय ज्वेलरीमुळे त्वचेवर लालसर पुरळ येते. शिवाय आर्टिफिशियल कानातले, अंगठ्या, कडे यांमुळे त्वचेवर इन्फेक्शनदेखील होऊ शकते.
३) त्वचेवर गाठ येणे – आर्टिफिशियल ज्वेलरी अस्वच्छ वापरत असाल, तर त्वचेवर कोणत्याही ठिकाणी बॅक्टेरियांच्या संसर्गामुळे एलर्जीक रिएक्शन म्हणून रक्ताच्या किंवा मांसाच्या गाठी तयार होऊ शकतात.
४) खाज येणे – आर्टिफिशीयल ज्वेलरीमुळे त्वचेवर खाज येते. त्यात पावसाळ्यात खाज सुटण्याची समस्या उदभवते. त्यामुळे पावसाळ्यात आर्टिफिशियल दागिने वापरणे टाळा.
५) त्वचेवर ड्राय पॅच येणे – आर्टिफिशीयल ज्वेलरीच्या वापरामुळे त्वचेवर कोरडे डाग तयार होतात. त्यामुळे त्वचा संवेदनशील किंवा कोरडी असणाऱ्यांनी आर्टिफिशियल ज्वेलरी वापरू नये.
० उपाय
१) आर्टिफिशियल ज्वेलरीचा वापरच टाळा. इच्छुक असाल तरीही दररोज वापरू नका.
२) त्वचेला डिसइंफेक्टेंट्सनं स्वच्छ करा.
३) एंटी फंगल पावडर किंवा एंटी बॅक्टेरियल क्रिमचा वापर करा.
४) आर्टिफिशियल कानातले वापरल्यामुळे इन्फेक्शन झाले, तर लिंबाची बारिक काडी कानात घालून ठेवा.
५) आर्टिफिशियल ज्वेलरीमूळे इंफेक्शन झालेल्या त्वचेवर एलोवेरा जेल लावा.
६) आर्टिफिशियल ज्वेलरीमूळे इंफेक्शन झालेल्या त्वचेवर नारळाचे तेल लावा.
७) आरर्टिफिशियल ज्वेलरीमुळे इंफेक्शन झाल्यास हळदीचा लेप वापरावा.
८) जखम झाली असल्यास गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे.
९) इन्फेक्टेड त्वचेवर केस सलणार नाहीत याची काळजी घ्यावी.