पोटावर झोपण्याची सवय आत्ताच मोडा, नाहीतर होतील गंभीर परिणाम; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। दिवसभर भरपूर काम झाल्यानंतर रात्री एकदा जेवल्यावर कुणाचेही पाय थेट अंथरुणाच्या दिशेनेच वळतात, यात काहीच शंका नाही. अनेक लोकांना एका कुशीवर झोपायची सवय असते. तर काहींना पोटावर हाथ ठेवून झोपायची सवय असते. इतकेच काय तर काही लोकांना पोटावर पालथे झोपायचीही सवय असते. या झोपण्याच्या सवयींमुळे निश्चितच त्या त्या व्यक्तीला रिफ्रेशिंग वाटत. पण यात कितीही रिफ्रेश फील असला तरीही प्रत्येक झोपण्याची सवय फायदेशीर आहेच असे नाही. कारण पोटावर पालथे झोपण्याची सवय शरीराच्या आरोग्याचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरते. जर तुम्हाला हे माहित नसेल तर हा लेख जरूर पूर्ण वाचा.
० पोटावर पालथे झोपणे आरोग्याला त्रासदायक कसे?
– आपल्या निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीला किमान ८ तासांची शांत झोप गरजेची असते. जर अशी झोप आपल्या शरीराला मिळाली तर अनेको व्याधींपासून शरीर दूर राहते. परंतु यासाठी रात्री आपण कोणत्या स्थितीत झोपतो हेदेखील महत्वाचे आहे. याबाबत काही खास गोष्टी खालीलप्रमाणे:-
* रात्रीच्या जेवणानंतर किमान २ ते ३ तासानंतरच झोपी जावे. अन्यथा पचनक्रियेत बिघाड होतो.
* झोपताना थेट पोटावर झोपल्याने अन्न पचत नाही आणि पोटदुखीची समस्या देखील होऊ शकते.
* रात्री झोपताना नेहमी एका कुशीवर झोपावे. यासाठी आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने डाव्या कुशीवर झोपणे फायदेशीर ठरते.
० पोटावर झोपण्याचे दुष्परिणाम कोणते?
– आरोग्य तज्ञांच्या सांगण्यानुसार, पोटावर झोपणे हे आरोग्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकते. याचे अनेको दुष्परिणाम आपल्या शारीरिक आरोग्याशी आणि मानसिक आरोग्याशी संबंध ठेवतात. तर पोटावर झोपण्याचे दुष्परिणाम कोणते ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
* पोटावर झोपल्याने मणक्याला त्रास होतो. यामुळे मणक्याची स्थिती नाजूक होते. या स्थितीत झोपल्याने मणक्याला बाक येतो. परिणामी मणक्याचे आजार वाढतात.
* पोटावर झोपल्यामुळे छातीवरही ताण येतो. पोटावर झोपण्याची सवय नियमित स्वरूपाची असेल तर छातीत कफ साठणे आणि बरगड्यांमध्ये दुखणे अश्या समस्या उदभवतात.
* पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे आपल्या मानेला त्रास होऊ शकतो. कारण पोटावर झोपताना मान एका बाजूला वळली जाते आणि परिणामी मानेचे दुखणे, आखडणे हे त्रास होतात.
० पोटावर नाही? मग कोणत्या स्थितीमध्ये झोपावे ?
– आता तुम्ही म्हणाल पालथे पोटावर झोपायचे नाही हे ठीक आहे पण मग झोपायचे कसे? यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे:-
* पोटावर झोपल्यामूळे होणारा त्रास टाळण्यासाठी पाठीवर किंवा कुशीवर झोपण्याची सवय लावा. कारण वाईट सवयी वेळीच सोडणे कधीही फायदेशीर असते.
* याशिवाय पोटावर झोपण्याची सवय सुटत नसेल तर किमान झोपताना पोटाखाली उशी घ्यावी. पण यामूळे झोप लागत नाही आणि शरीराचा थकवा कायम राहतो.