कांद्याची हिरवी पात देई आरोग्यास उत्तम साथ; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। काद्यांची हिरवीगार पात खायला अतिशय चविष्ट असते. त्यामुळे अनेक पदार्थांमध्ये कांद्याच्या पातीचा समावेश असतो. आजकाल तरुणाईमध्ये चायनीस खाण्याचे क्रेझ भयंकर आहे. तुम्ही जे चायनीज चवीचवीने मिटक्या मारत खाता ना त्याची चव बहारदार बनविण्यामध्ये हिरव्या पातीचा कांदा मुख्य भूमिका भूषवितो. तसे पाहाल तर कोणत्याही हिरव्या भाज्या या आपल्या आरोग्यासाठी १००% गुणकारी आणि फायदेशीर असतात. त्यात कांद्याची पात खायला जितकी चविष्ट आरोग्यासाठी तितकीच उत्तम. कारण यात अनेक पौष्टिक तत्वे आहेत. जी तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
मुख्य म्हणजे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेको घटक कांद्याच्या पातीमध्ये समाविष्ट असतात. यात कार्बोहाइड्रेट्स, विटामिन सी, प्रोटीन, फॉस्फरस, सल्फर आणि कॅल्शियम असते. सर्वात महत्वाचे म्हणजे काद्यांची पात खाल्लाने तोंडाची दुर्गंधी दूर होते. होय. आपण हे ऐकले असाल कि कांडा खाल्ल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते पण काद्यांची पात खाल्लांने दुर्गंधी जाते हे खरे आहे. याशिवाय दृष्टिदोषातही कांद्याची पात फायदेशीर आहे. यामुळे मोतीबिंदूची लक्षणे कमी होतात. चला जर जाणून घेऊयात कांद्याची पात खाण्याचे फायदे –
१) रक्तदाबावर नियंत्रण – हिरव्या पातीच्या कांद्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. शिवाय यात व्हिटामिन सीचे प्रमाणसुद्धा अधिक असते. परिणामी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि रक्त दाबावर नियंत्रण मिळविण्यास मदत मिळते.
२) रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण – कांद्याच्या पातीमध्ये ओनियन्स सल्फर असते. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत मिळते. यातील सल्फर संयुगे शरीरात इन्सुलिन तयार करण्याची क्षमता वाढवतात आणि मधुमेह रोखण्यासाठीदेखील फायदा होतो.
३) निरोगी हृदय – हिरव्या पातीच्या कांद्यात कॉपर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्रोमियम, मॅगनीज आणि फायबरचे भरपूर असते. यामुळे हिरव्या पातीच्या कांद्याच्या सेवनाने हृद्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
४) कॅन्सरवर रोख – हिरव्या पातीच्या कांद्यामध्ये सल्फर अधिक असते. यामुळे कॅन्सरच्या सेल्सची वाढ होत नाही. तसेच कॅन्सरशी लढण्यासाठी कांद्याची पात अतिशय प्रभावी आहे. म्हणूनच आठवड्यातून किंवा महिन्यातून किमान एकदा कांद्याची पात खावी.
५) पचनप्रक्रियेत सुधार – कांद्याच्या हिरव्या पातीमध्ये फायबर खूप असते. हे फायबर पचन सुधारण्यास मदत करते. यासाठी कांद्याच्या पातीचे कोणतेही पदार्थ किंवा कांद्याची पात कच्ची खाणे फायद्याचे ठरते.
६) दृष्टीदोषात प्रभावी – कांद्याची पात डोळ्यांसाठी अतिशय लाभदायक आहे. कारण कांद्याच्या पातीमध्ये ‘विटामीन ए भरपूर असते. त्यामुळे मोतीबिंदू होण्यावर रोख लागतो. यासाठी कांद्याची पात, गाजर आणि काकडीसह सॅलड स्वरूपात खावी.
७) केसांसाठी पोषक – केसांच्या मुळाच्या मजबूतीसाठी पोषक तत्व गरेजेची असतात. हि पोषक तत्व कांद्याच्या पातेत असतात. त्यामुळे कांद्याची हिरवी पात आणि कोवळा कांदा यांचा रस काढून केसांना लावा. यामुळे केस गळतीपासून सुटका मिळते. शिवाय याचा लेप लावला असता कोंड्याच्या समस्या दूर होतात.
८) चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीश्या होतात – काही लोकांना फार कमी वयात चेहऱ्यावर सूरकत्या पडतात ज्यामुळे सौंदर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. यासाठी कांद्याच्या पातीचे सेवन करावे. काही दिवसात चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी आणि कालांतराने नाहीश्या होतात.