हलका फुलका मखाना खा आणि स्वस्थ जगा; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। मखाना म्हणजे हलका फुलका टाईमपास नाश्ता पण त्याचसोबत एक पौष्टिक खाद्य. दिसायला थोडाफार पॉपकोर्न सारखा पण चवीला एकदम अलग. आता तुम्हाला अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं झालाच तर मराठीत मखानाला कमळाचे बीज म्हणून ओळखले जाते. मात्र संपूर्ण जगभरात हा पदार्थ मखाना म्हणूनच प्रसिद्ध आहे. ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी मखाना एकदम उत्तम पर्याय आहे. कारण हा पदार्थ आपली भूक शमवतोसुद्धा आणि शरीराला पुरेशी उर्जा देखील देतो. याशिवाय मखाना जास्त खाल्ला म्हणून शरीरावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही. अनेक लोकांना अजूनही मखाना माहित नाही. त्यामुळे त्याचे फायदे सुद्धा माहित नाहीत. म्हणून आज आम्ही तुम्हाला मखाना खाण्याचे फायदे सांगणार आहोत. हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही मखाना आवडीने खाल.
१) अँटीऑक्सीडेंटयुक्त पदार्थ – मखाना खाल्ल्याने शरीरातील अँटीऑक्सीडेंट वाढतात. कारण मखाना मध्ये अँटीऑक्सीडेंटची मात्रा अधिक असते. अँटीऑक्सीडेंट हा शरीराला आवश्यक असणारा अति महत्त्वाचा घटक आहे. कारण यामुळे आपल्या शरीराची त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट होते.
२) ऍनिमियावर मात – ज्यांच्या शरीरात रक्ताची कमी असते आणि त्यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवतो त्यांनी मखाना खाणे फायद्याचे आहे. कारण मखानामध्ये लोह भरपूर असते. जे शरीरातील रक्ताच्या कमतरतेला भरून काढते. पण मुळात लोह असलेले सगळे पदार्थ चांगल्या चवीचे असतात असं मुळीच नाही, म्हणून ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे आणि तोंडाला चव देणारा पदार्थ खाण्यासोबत लोहयुक्त पदार्थांचे देखील सेवन करावे. शरीरात रक्ताची कमतरता नसल्यामुळे साहजिकच ऍनिमिया रोगावर मात करता येते.
३) उच्च रक्तदाबावर नियंत्रण – ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी मखाना उत्तम आहे. कारण मखाना खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. शिवाय उच्च रक्तदाबामुळे शरीराला होणारे अपाय सुद्धा रोखले जातात. कारण मखानामध्ये मॅग्नीशियमचे प्रमाण जास्त असते. हे एक असे खनिज आहे जे रक्तदाबाला संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. म्हणूनच रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांना मखाना खाणे फायदेशीर ठरते.
४) मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर – मधुमेहाचे रुग्ण मखानाचे सेवन न घाबरता करू शकतात. कारण, मखानामध्ये कमी ग्लाईसेमिक इंडेक्स असतं. ज्यामुळे मधुमेह होणाच्या धोका कमी होतो.
५) हाडं मजबूत होतात – वृद्ध लोकांना दिवसातून किमान दोनवेळा मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण मखानामध्ये कॅल्शीयमची मात्रा भरपूर असते आणि कॅल्शिअम हाडांना बळकटी देतात. तसेच कॅल्शीयम हे वाढत्या वयासोबत कमजोर होणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्याचेही काम करतं. त्यामुळे हाडांसाठी फायदेशीर असणारा मखाना केवळ वृद्ध नव्हे तर तरुणी वर्गसुद्धा आवडीने खाऊ शकतो.