आता जखमांसोबत त्यांचे डागही विसरा; जाणून घ्या घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। असं म्हणतात कि काही जखमा आयुष्यभर विसरता येत नाहीत. पण या जखमा मनावरच्या असतात शरीरावरच्या नाही. त्यामुळे शरीरावर झालेल्या जखमा विसरणे आणि पुसणे दोन्ही शक्य आहे. पुसणे अर्थात जखमांचे वण अनेको वर्ष जसेच्या तसे राहतात. ज्यामुळे अनेकदा आपण शरीराचा तो भाग कसा झाकला जाईल याकडे लक्ष देतो. पण आता कजखमांचे व्रण लपवण्याची काहीच गरज नाही. कारण जखमांचे डाग अर्थात व्रण काढून टाकण्यासाठी घरातल्या घरात आपण सोप्पे उपाय करू शकतो.
अनेकदा घरकाम करताना लहान सहान जखमा आपल्याला होत असतात. म्हणा स्वयंपाकघर म्हटले म्हणजे अपघात तर होणारच. जसे कि भाजी चिरताना कापणे, पोळी भाजताना भाजणे आणि एखादा पदार्थ तळताना तेल उडणे. या अश्या घटना स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात होत असतात. या जखमा थोड्या दिवसांनी हळू हळू बऱ्या होतात पण यांचे हट्टी व्रण. ते अनेको वर्ष आपला पिच्छा पुरवतात. तसेच लहान मुले खेळताना, धावताना कुठेतरी धडपडतात आणि मुख्य म्हणजे सायकल चालवताना हमखास पडतात. मग ढोपर फुटणे, कोपर घासपटणे, डोक्याला मार अश्या घटना घडतात. या जखमांचे व्रण काही केल्या जात नाहीत आणि मग ते डाग पाहून त्या आठवणी पुन्हा मनात येतात. म्हणूनच या जखमांचे व्रण वेळीच दूर करणे गरजेचे आहे. प यासाठी कोणत्याही महागड्या थेरेपी करण्याची गरज नाही. त्यामुळे घाबरू नका. अगदी घरच्या घरी सोप्प्या घरगुती उपायांनी आपण जखमांचे डाग घालवू शकतो . जर हे उपाय तुम्हाला माहित नसतील तर लगेच जाणून घ्या.
१) बार्ली, हळद आणि दही – बार्ली, हळद आणि दही हे मिश्रण एक उत्तम घरगुती उपाय असून याचा वापर जखमांचे डाग घालविण्यासाठी होतो. यासाठी बार्ली, हळद, दही हे तीनही पदार्थ सम प्रमाणात घ्या आणि त्याचे मिश्रण बनवा. यानंतर तयार मिश्रण हलक्या हाताने जखमेवर लावा. यामुळे हळदीतील अँटिसेप्टिक गुणधर्म जखमेमुळे होणा-या संसर्गावर रोख लावतील आणि बार्ली व दह्यातील घटक जखमेचा डाग सोडणार नाहीत.
२) लिंबू व टोमॅटोचा रस – लिंबू आणि टोमॅटो यांमधील घटक जखमांच्या डागांवर प्रभावी काम करतात. या रसांच्या मिश्रणामुळे डेड स्किनसुद्धा उजळ होण्यास मदत होते. कारण लिंबातील अॅसिडिक घटक नैसर्गिकरित्या व्रणांचे डाग हलके करतात. तर ताज्या टोमॅटोच्या रसातील ब्लिचिंग घटक जखमेचे व्रण कमी होण्यास मदत करतात. यासाठी, झालेली जखम आधी साध्या पाण्याने धुवा आणि जखमेवर काही तास ओले स्वच्छ कापड ठेवा. यानंतर काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेले स्वच्छ कापड जखमेवर ठेवा आणि हि त्वचा सुकल्यानंतर त्यावर टोमॅटोचा रस लावा. असे नियमित दिवसातून दोनदा केल्यास जखमेचे व्रण राहत नाही. याशिवाय लिंबू आणि टोमॅटोचा एकत्र रस वापरल्याने जखमेचा डाग निघून जाण्यास मदत होते.
३) बटाट्याची साल – बटाट्याची साल हा एक प्राचीन घरगुती उपाय आहे. बटाट्याच्या सालीतील दाहशामक गुणधर्म तसेच अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म जखम लवकर बरी होण्यासाठी मदत करतात. यासाठी बटाट्याची साल जखमेवर लावा. लवकर आराम मिळवण्यासाठी बटाटयाची साल बॅन्डेज म्हणून बांधून ठेवा.
४) मेथी दाणे – मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याची मिक्सरच्या साहाय्याने पेस्ट बनवा. हि पेस्ट जखमेवर लावा आणि पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने जखम स्वच्छ धुवा.
५) आंबे हळद – आंबे हळदीची थोडे थोडे पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. हि पेस्ट आपली जखम लवकर भरण्यास आणि जखमेचे व्रण दूर करण्यास मदत होते.
६) बदामाचे तेल – बदामाचे तेल जखमेवर लावल्याने लवकर आराम मिळतो. यासाठी दिवसातून दोनवेळा बदामाचे तेल जखमेवर लावून हलका मसाज करा.
७) लव्हेंडर ऑईल – लव्हेंडर ऑईल हे तेल दाहशामक असल्याने जखम भरून काढण्यास मदत होते. त्यामुळे जखम झाल्यानंतर शक्य जितक्या लवकर लव्हेंडर ऑईलचा वापर करा. यामुळे जखमेचे व्रण होण्याची शक्यता कमी होते. परंतु जखम खूप मोठी असेल तर कापडाच्या बोळ्यावर तेल घालून ते काही ठराविक तासाने लावावे.