चिंताजनक लैंगिक शक्तीसाठी लसणीचे तेल गुणकारी; जाणून घ्या इतरही फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। लसूण हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात असतोच. कारण लसणीच्या पाकळ्यांचा वापर जेवणातील विशिष्ट चवीसाठी होतो. त्यामुळे प्रत्येक फोडणीसाठी लसूण हवाच. याशिवाय लसणात भरपूर औषधी गुण समाविष्ट असतात. त्यामुळे दररोजच्या आहारात लसूण वापरल्यामूळे अन्नाची चव वाढतेच आणि सोबतच आरोग्यालाही फायदा होतो.
विशेष म्हणजे, लसूण अत्यंत आरोग्यदायी असतोच मात्र याच्या आरोग्यदायी गुणधर्मांचा अत्याधिक लाभ लैंगिक शक्ती कमजोर वा गमावलेल्या रुग्णांना अधिक होतो. त्यामुळे पुरुषांनी लसून जास्त प्रमाणात सेवन करावे. शिवाय लसणीच्या तेलामुळे रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. चला तर लसणीच्या तेलाचे होणारे अन्य फायदे जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-
१) लसणीत सर्वात जास्त अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं पोटाचे विकारही दूर होतात.
२) लसूणमध्ये अँटी ऑक्सिडेंट घटक मोठ्या प्रमाणात असतात ज्यांचा फायदा कर्करोगासारख्या आजाराच्या विषणुंवर रोख लावण्यासाठी होतो. परिणामी कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
३) लसणीच्या तेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचारोग दूर होण्यास मदत होते. खरुज, खाज येणे, सोरायसिस यांसारख्या त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी या तेलाचा फायदा होतो. यासाठी खाज सुटत असलेल्या भागावर कापसाच्या बोळ्याने लसणीचे तेल लावावे. यामुळे लवकर आराम पडतो. शिवाय त्वचेचा संसर्ग दूर होतो.
४) मुरुमांच्या समस्येमुळे चेहऱ्यावर डाग पडले असतील तर यावर लसणीच्या तेल प्रभावी आहे. कारण लसणीच्या तेलामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांच प्रमाण कमी होतं. यासाठी अर्धा चमचा लसूण तेलात मुलतानी माती मिसळून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट फेसपॅक प्रमाणे १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
५) लसणीच्या तेलाचा केसांना खूप फायदा होतो. या तेलामुळे टाळूवरील कोंडा, लाल पुरळ, खाज सुटणे या समस्या कमी होतात. शिवाय टाळू आणि केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळते. परिणामी केस दाट होतात. शिवाय केसांत उवा झाल्या असतील तर हे तेल गरम करून लावा आणि सकाळी शँम्पूच्या साहाय्याने केस स्वच्छ करा. उवांचा त्रास निघून जाईल.
६) आजकाल अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने अनेको लोक त्रस्त आहेत. यावर लसूण तेल प्रभावी आहे. लसणीच्या तेलाने केसांवर चांगली मालिश करा आणि एका तासाने शॅम्पूने केस धुवा.