चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्याला होतात अनेको फायदे; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। चंदनाचं महत्त्व हिंदू धर्मापासून परंपरागत औषधींमध्ये सुद्धा आहे. याचे कारण असे कि, सर्व प्रकारच्या पूजा विधींमध्ये चंदनाचा तिला अत्यंत पवित्र मानला जातो. अगदी पूजा – पाठ, होम – हवन या साठी चंदनाच्या काड्या लागतातच. पण तुम्हाला माहित आहे का? चंदनाचा तिला आपल्या आरोग्याला अनेको लाभ देतो. काय? तुम्हाला हे लाभ माहित नाहीत? मग काळजी करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला याच चंदनाच्या साधारण महत्व सांगणार आहोत. जाणून घ्या कारण खालीलप्रमाणे:-
– आपल्या कपाळाच्या मध्यभागी अर्थात आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी ‘अग्न’ चक्राचे मूळ स्थान असते. या स्थानाला ‘तिसरा डोळा’ असे म्हणतात. अध्यात्मात या स्थानाला विशेष महत्व आहे. कारण आपल्या शरीरातील हे एक ऊर्जा स्थान आहे. जे आपल्याला आरोग्य देते. कदाचित म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याची प्रथा अनेको वर्षांपासून सुरु आहे. चला जाणून घेऊयात चंदनाच्या टिळ्याचे फायदे:-
१) एकाग्रता सुधार – तिसरा डोळा आपली एकाग्रता केंद्रित करण्याचे काम करते. याशिवाय चंदनाचा टिळा कपाळावर लावल्यास डोकं शांत आणि मन स्थिर राहते. याचे कारण म्हणजे चंदन हे थंड प्रवृत्तीचे असते.
२) सकारात्मकतेत वाढ – तिसर्या डोळ्याचे स्थान हे आपले अंतर्मन आणि सुविचारांचे केंद्रस्थान आहे. याशिवाय नकारात्मक विचारातून शरीरात येणारी नकारात्मक भावना या स्थानाच्या माध्यमातून आपल्या शरीरात येते. मात्र, केवळ चंदनाच्या टिळ्यामुळे त्यांना रोखण्यात यश येते.
३) तणावापासून मुक्तता – थकवा, मानसिक अस्थिरता आणि निरुत्साह यामुळे निद्रानाश होतो. परिणामी तणावाची समस्या उदभवते. आयुर्वेदानुसार कपाळावरील चंदनाचा टिळा मानसिक त्रासातून मुक्तता करण्यास मदत करतो.
४) डोकेदुखीवर परिणामकारक – तिसरा डोळा हे स्थान दोन्ही भुवयांच्या मध्य शरीरातील नसा एकत्र मिळण्याची जागा समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी मसाज केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. तसेच या ठिकाणी चंदनाचा टिळा लावल्यास नसांमध्ये थंडावा निर्माण झाल्याने डोकेदुखीची समस्या दूर होते.
५) शरीरातील उष्णता कमी होते – चंदनामध्ये आपल्या शरीरात थंडावा निर्माण करण्याची क्षमता असते. ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि त्वचेच्या समस्या दूर होतात. याशिवाय शरीरातील नसांनादेखील थंडावा मिळतो.