संत्र्याची साल देते कमालीचे सौंदर्य; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपली त्वचा इतरांपेक्षा सुंदर, तेजस्वी आणि तजेलदार असावी असे कुणाला वाटत नाही. मग यासाठी आपण न जाणे कित्येक विविध प्रयोग करीत असतो. बाजारात मिळणारी कितीतरी महागडी सौंदर्य प्रसाधने वापरून आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. पण तरीही आपल्याला हवा तास फरक पडत नाही आणि मग आपण नाराज होतो. पण आता नाराज काय व्हायचं? त्यापेक्षा काहीतरी नैसर्गिक पर्याय वापरणे अधिक सोपे आहे नाही का. आता तुम्ही म्हणाल नैसर्गिक अर्थात नक्की काय? तर मैत्रिणींनो आपल्या त्वचेच्या प्रत्येक लेयरसाठी काही पोषक तत्त्वांची गरज असते आणि हि तत्त्व कोणतेही केमिकलयुक्त प्रसाधन नव्हे तर नैसर्गिक गुणांनी समृद्ध पर्याय देऊ शकतात. जसे कि, बहुगुणी संत्र्याच्या सालीची पावडर. होय. संत्याची साल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर भूमिका निभावते. त्यामुळे संत्र्याचा सीझन गेला तरीही घाबरू नका. तुम्ही संत्र्याच्या सालीची पावडर करुन त्याचे फायदे वर्षभर घेऊ शकता. चला तर जाणून घेऊयात संत्र्याच्या सालीचे फायदे आणि त्याचा योग्य वापर खालीलप्रमाणे:-
० संत्र्याच्या सालीचा उपयोग
– संत्र चवीला आंबट गोड असते. तर संत्र्यात व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. आता नेमक्या कोणत्या कारणांसाठी संत्री खायला हवीत, असा विचार तुम्ही करत असाल. तर संत्र खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण संत्र्याचा गरच नाही तर संत्र्याच्या सालीचादेखील बराच उपयोग होतो. जाणून घ्या.
१) त्वचा उजळ होते – प्रदुषण आणि वातावरणातील बदल यामुळे त्वचा काळवंडते आणि त्वचेवरील तेज विरते. यासाठी संत्र अतिशय फायदेशीर आहे. संत्र्याच्या सेवनामुळे त्वचेचा रंग उजळतोच शिवाय त्वचेला आवश्यक अशा गोष्टी मिळाल्यामुळे ती नैसर्गिकरित्या चमकू लागते.
२) कोलॅजन वाढीस चालना मिळते – उत्तम आरोग्यासाठी हेल्दी कोलॅजन आवश्यक असते. आपल्या त्वचेसोबतच हाडांच्या बळकटीसाठी ते गरजेचे असते. तसेच शरीरातील पेशींचे कार्य योग्य करण्याचे काम देखील कोलॅजन करते. याशिवाय संत्र्याच्या सेवनामुळे कोलॅजनला चालना मिळते आणि त्वचेमधील इलास्टिसिटी वाढते. परिणामी सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते.
३) पिंपल्स, डाग कमी होतात – संत्र खाल्यामुळे शरीरातील पाण्याची मात्रा संतुलित राहते. त्यामुळे पिंपल्सचा त्रास कमी होईल. शिवाय संत्र्याच्या सालीचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सचे डागही कमी होतात.
४) चिरतारुण्य – आपली त्वचा चिरतरुण ठेवायची असेल तर संत्र्याचा वापर हमखास करा. कारण संत्र्यांमधील आवश्यक घटकांमुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. परिणामी त्वचा चिरतरुण राहते.
५) ओपन पोअर्सच्या त्रासावर परिणामकारक – ओपन पोअर्सचा त्रास घालविण्यासाठी संत्र्याच्या सालीचे सिरम वापरावे. त्यामुळे तुमचे ओपन पोअर्स कमी होतील आणि यासोबत पिंपल्सचा त्रासही कमी होईल.
६) नैसर्गिक चमक – चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने ग्लो आणायचा असेल तर संत्र्याच्या ब्युटी प्रोडक्टसचा वापर करा. यामुळे चेहरा नीट आणि क्लीन राहतो शिवाय चेहऱ्यावरील दंगाची आणि सुकुट्यांची समस्या दूर राहते आणि चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो.