आरोग्यास हानिकारक भेसळयुक्त हळद कशी ओळखालं?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय भोजन व्यवस्थेत खाद्य पदार्थांच्या चवीला अत्यंत महत्व आहे. मुख्य म्हणजे खाद्यपदार्थांचा चव देणारे अनेको विशिष्ट पदार्थ असतात ज्यांच्यशिवाय होतच नाही. असाच एक पदार्थ म्हणजे हळद. मात्र हळद फक्त स्वयंपाकासाठीच वापरली जाते असं नाही तर तिचा वापर अत्यंत उपायकारी औषधाप्रमाणेही केला जातो. एखादी जखम लवकर भरून येण्यासाठी हळद जखमेवर लावली जाते. इतकेच काय तर रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी हळदीचे दूध प्यायले जाते. शिवाय त्वचेच्या अनेको समस्या दूर करण्यासाठी हळदीचा लेप लावला जातो.
अहो हळदीचे विशेष महत्व तर लगीनसराईत समजते. कारण लग्नात वधू वरांच्या चेहऱ्यावर ग्लो यावा यासाठी खास हळदी समारंभ केला जातो. म्हणजेच एकंदर काय तर हळदीचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. पण दोस्तहो हेच मुख्य कारण आहे हळदीत भेसळ केले जाण्याचे. कारण खूप जास्त मागणी असलेली हळद लोक काहीही करून विकत घेतात त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे चांगलेच फावते. पण अशी भेसळयुक्त हळद आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक भूमिका बजावते. अशी भेसळयुक्त हळद स्वयंपाकासाठी, औषधासाठी अथवा त्वचेसाठी वापरली गेली तर त्याचे अनेको दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठीच भेसळयुक्त हळद कशी ओळखावी याच्या काही खास टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
० हळदीची शुद्धता कशी तपासालं?
स्टेप १ – एक ग्लास पाणी घ्या.
स्टेप २ – त्या पाण्यात एक चमचा हळद पावडर मिसळा.
स्टेप ३ – जर तुमची हळद शुद्ध असेल तर पाण्यात तळाशी जावून बसेल आणि पाणी पिवळ्या रंगाचे होईल.
स्टेप ४ – जर तुमची हळद भेसळयुक्त असेल तर पाण्याचा रंग काळसर पिवळा होईल.
– मित्रहो, हळदीमध्ये भेसळ करण्यासाठी मक्याची पावडर, पिवळा रंग, तांदळाचा कोंडा असे पदार्थ मिश्रित केले जातात. हि अशी भेसळयुक्त हळद खाण्याने ह्रदयाचे आरोग्य बिघडते. खरतर बाजारात मिळणारी हळद शुद्ध आहे की अशुद्ध हे समजणं अवघड असतं. कारण हळदीचा रंग पिवळाच दिसत असल्यामुळे त्यातील फरक डोळ्यांना बिलकुल समजत नाही. परंतु भेसळयुक्त पदार्थ खाणे आरोग्यासाठी हिताचे नसल्यामुळे प्रत्येकाला अशा पदार्थांची ओळख असायला हवी. FSSAI अर्थात अन्न सुरक्षितता आणि प्रमाण संस्थेने भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठी एक सिरिज सुरू केली आहे. ज्याचं नाव #Detectingfoodadultera आहे. या परिक्षणाअंतर्गत मीठ, मसाले यांच्यामध्ये होणारी भेसळ ओळखता येईल. त्यामुळे भेसळ टाळण्यासाठी तुम्ही हळद खरेदी करताना त्यावर FSSAI मार्क आहे का हे तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. ब्रॅंडेड हळदीच्या पाकीटावर असा मार्क असतो. मात्र जर तुम्ही बाजारात सुट्टी हळद विकत घेणार असाल तर ती घेण्याआधी ती या प्रमाणानुसार तपासून पहा आणि मगच विकत घ्या. कारण आपले आरोग्य आपली जबाबदारी!