जर मुलं अंथरुणात लघवी करत असतील, तर करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपली मुलं अंथरुणात लघवी करतात हि बाब अनेक पालकांना अतिशय लाजिरवाणी वाटते. पण पालकहो, लहान असेपर्यंत मुलांनी अंथरुणात लघवी करणे हि अगदी स्वाभाविक बाब आहे. हा पण मुलं मोठी झाल्यानंतर अंथरुणात लघवी करीत असेल तर थोडी चिंतेची बाब नक्कीच आहे. यामागील मूळ चिंता म्हणजे मुलं बाहेर गेली आणि त्यांची ही सवय सगळ्यांना कळली की, त्याचा आणखी त्रास होईल असे पालकांना मनोमनी वाटते. परिणामी मुलं अंथरुणात लघवी करत असतील तर पालकांपेक्षा जास्त मुलांच्याच मनात शंका निर्माण होते. इतकेच काय तर मुलं या गोष्टीचे टेन्शन घेऊ लागतात. यामुळे मुलांना मानसिक त्रास होतो आणि त्यांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे कृपया पालकांनी या गोष्टीचा बाऊ न करता आपलूं मुलांच्या पाठिशी सक्षम राहून काही साधे सोप्पे उपाय करणे गरजेचे आहे. ज्यामुळे मुलांची ही समस्या दूर होऊ शकेल आणि त्यांना स्वतःविषयी न्यूनगंड वाटणार नाही. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) आपल्या मुलांना सतत रागावून बोलू नका – अनेकदा मुलं सुट्टी मजेत घालवण्यासाठी नातेवाईकांच्या घरी जातात. दरम्यान त्यांना सवयीनुसार अंथरुणात लघवी झाली कि घरातील इतर लहान मुले त्यांना हसतात. त्यांचे हसू झालेले पाहून पालकांना खूप अपमानकारक वाटते. त्यामुळे अशावेळी मुलांना ओरडणे हा पर्याय पालक अवलंबतात. पण पालकांनो, आपल्या अपत्याने अंथरुणात लघवी केलेली कळाल्यानंतर त्यांना ओरडणे हा पर्याय नसून चूक आहे. कारण यामुळे मुलांच्या मनावर त्याचा अधिक परिणाम होतो आणि मुलं मानसिक तणावाखाली येतात. ज्यामुळे हि सवय आणखीच भिनते. त्यामुळे त्यांना हा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर मुलांशी प्रेमाने आणि मायेने संवाद साधा.
२) लघवी थांबवायला शिकवा – मुलांना लघवी झाल्यानंतर सकाळच्या वेळेत त्यांना लघवी थांबवायला शिकवा. त्यामुळे झोपेत लघवी धरुन ठेवण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल. पण ही लघवी रोखून धरण्याची सवय जास्त नको. कारण जास्त काळ लघवी धरुन ठेवली तर मुलांना त्रास होऊ शकतो. डायपरसारखा पर्याय वापरल्यास मुलांना बाथरुममध्ये जाऊन लघवी करण्याची सवय लागत नाही. त्यामुळे काही मिनिटांसाठी लघवी रोखायला धरणे त्यांना शिकवा.
३) संध्याकाळी पाणी कमीच द्या – हा त्रास हा मुलांनी संध्याकाळी अधिक पाणी अधिक प्यायल्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे संध्याकाळी ६ नंतर मुलांना कमीच पाणी द्या. पाणी कमी दिल्यामुळे त्यांना झोपेत लघवीचा त्रास होण्याची शक्यता कमी होईल. मुख्य म्हणजे, शरीरात पाणी कमी झाल्याने त्याचे रुपांतर एनर्जीत होते लघवीत नाही. यासाठी ही सवय किमान २-३ महिने लावा. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यामध्ये झालेला फरक नक्की जाणवेल.
४) रात्रीचे थंड पदार्थ खाऊ देऊ नका – मुलांना रात्री जेवल्यानंतर आणि झोपण्याआधी आईस्क्रिम खायची सवय असते. यात काही मुलं फेरफटका आणि आईस्क्रीमसाठी हट्ट करताना दिसतात. पण हि हट्ट करण्याची सवय आताच मोडीत काढा. कारण मुलांना अशी सवय लागली की ती जाता जात नाही. त्यामुळे मुलांना रात्री थंड पदार्थ देऊ नका. परिणामी लघवीचा त्रास होणार नाही.
५) झोपण्यापूर्वी लघवी करायला जरूर लावा – मुलांना झोपवताना किंवा त्यांच्या झोपण्याच्या वेळेआधी त्यांना लघवी करायला लावा. त्यामुळे मुलांना रोज रात्री झोपण्यापूर्वी लघवीला जायची सवय लागेल आणि ही सवय फायद्याची ठरेल. कारण त्यामुळे त्यांना रात्री लघवी होण्याची शक्यता कमी असते. जर तुम्हाला शक्य असेल तर मुलांना मध्यरात्री किंवा पहाटे उठवून पुन्हा एकदा लघवी करायला लावा. असे केल्यामुळे लघवी झाल्यानंतर बाथरुममध्ये उठून जाण्याची सवय त्यांना अगदी हमखास लागेल आणि झोपेत अंथरुणात लघवी होण्याची समस्या मिटेल.