संवेदनशील त्वचेसाठी कोरफड एक वरदान; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। संवेदनशील त्वचा असणं म्हणजे अत्यंत काळजी घेण्याची बाब. कारण सौंदर्य मिळविण्यासाठी कोणतेही उत्पादन वापरणे म्हणजे संवेदनशील त्वचा असणाऱ्या लोकांसाठी आव्हानच. मुख्य म्हणजे, त्वचेला योग्य हायड्रेशन मिळाल्यास त्वचा नेहमी टवटवीत आणि तजेलदार राहते. यासाठी नेहमी नैसर्गिक उत्पादन वापरावे असा सल्ला तज्ञ देतात. त्यात जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर नैसर्गिक उपयांहून उत्तम काहीच नाही. यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते ते कोरफड. होय. रंग, केमिकल्स आणि अन्य आर्टिफिशियल सौंदर्य उत्पादनांमुळे संवेदनशील त्वचेला त्रास होतो. यामुळे त्वचेची जळजळ, रॅश आणि त्वचा खराब होऊ लागते. यापासून वाचण्यासाठी कोरफडीचा गर त्वचेसाठी उत्तम ठरतो. तुमच्या त्वचेच्या टाईप कोणताही असो त्याची काळजी घेण्यासाठी टोनर, सीरम वा तेल, मॉईस्चराईजर याहीपेक्षा काही उत्तम असेल तर कोरफड. म्हणून आज आपण कोरफडीचा त्वचेसाठी कसा फायदा करून घ्यायचा हेही जाणून घेणार आहोत आणि त्याचे फायदे नेमके काय तेही आम्ही सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
– कोरफड हे त्वचेसाठी वरदान समजले जाते त्याचे कारण म्हणजे त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येवर याचा चांगला परिणामकारक उपयोग करून घेता येतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी एक उत्तम उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग होतो. विशेषतः संवेदनशील त्वचेसाठी कोरफड अत्यंत लाभदायी मानली जाते. आपण कोरफडीपासून एक असे मिश्रण तयार करू शकतो ज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे केमिकल नसते. ज्यामुळे चेहऱ्यावर व अन्य त्वचेवर हे मिश्रण एखाद्या मॉइस्चरायझरप्रमाणे वापरल्यास त्वचेला हानी पोहचत नाही. याउलट त्वचा उजळ, तेजयुक्त आणि डागविरहित होते.
० साहित्य –
कोरफड जेल २ मोठे चमचे
ऑरगन ऑईल १ मोठा चमचा
० कृती व वापर – एका भांड्यात कोरफड जेल आणि ऑरगन ऑईल व्यवस्थित एकत्र करून घ्या. हे मिश्रण मॉइस्चरायझरप्रमाणे त्वचेवर लावा. हे मिश्रण अगदी दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी तुम्ही वापरू शकता.
० फायदे –
१) संवेदनशील त्वचेसाठी कोरफळ अत्यंत लाभदायक मानली जाते कारण यामध्ये विटामिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेच्या कोणत्याही समस्या दूर करू शकतात.
२) त्वचेमधून कोरडेपणा काढून टाकण्यासाठी कोरफडीचा गर अत्यंत फायदेशीर आहे.
३) बदलत्या ऋतूमध्ये त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कोरफडमधील मिनरल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि विटामिन्सचे कॉम्बिनेशन त्वचा अधिक हायड्रेट आणि मऊ मुलायम करण्यास मदत करते.
४) कोरफडमध्ये असणारे अँटीइन्फ्लेमेटरी गुण हे त्वचेवर येणारे रॅश, सूज वा खाजेसारखी समस्या दूर करतात.
५) कोरफडीचा गर चेहऱ्याला लावून झोपल्यास त्वचेला शीतलता मिळते आणि त्वचेवर मुरूम व पुटकुळ्या येण्याची समस्या दूर होते.
टीप – कोरफड ताजी मिळत नसेल तर हरकत नाही बाजारात मिळणाऱ्या केमिकल विरहित कोरफड जेलचा वापर तुम्ही त्वचेसाठी आणि अगदी केसांसाठीही करू शकता.