फेस मेकअप काढण्यासाठी मेकअप वाईप्स बेस्ट; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या सौंदर्याची काळजी घेणे हि प्रत्येकाची जबाबदारी असते. त्यामुळे जो तो आपल्या आपल्या परीने आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. शिवाय कोणताही समारंभ असो मुली विशेष करून मेकअप करताना दिसतात. अर्थातच त्यांच्या सौंदर्याला चार चांद लावण्याचे काम हा मेकअप करीत असतो. परंतु मेकअप केल्यानंतर तो चेहऱ्यावरुन काढणे अत्यंत गरजेचे असते. कारण हा मेकअप त्वचेवर असाच राहिला तर त्वचेच्या आत जाऊन त्वचा खराब करतो. परिणामी एकदा का त्वचेचा पोत आतून खराब झाला कि मग त्यावर कितीही चांगला मेकअप केला तरीही चेहरा निस्तेजच वाटतो.
आजकाल आय मेकअप, लिप्स मेकअप असे विविध प्रकार आले आहेत. ते निश्चितच आकर्षक असल्यामुळे महिला वर्ग याकडे अधिक प्रभावित होतो. पण मैत्रिणींनो मेकअप कोणताही केलात तरीही तो एका विशिष्ट वेळेनंतर काढणे अत्यंत जरुरीचे आहे विसरून चालणार नाही. या दरम्यान अनेक मुलींना मेकअप काढण्यासाठी नेमके काय वापरावे? हे कधीच कळत नाही. त्यात हल्ली बाजारात मेकअप वाईप्स सगळीकडे उपलब्ध आहेत. हे वाईप्स मेकअप काढण्यासाठी एक सोपा पर्याय आहे. पण जर तुम्ही मेकअप करत असाल आणि तुम्हाला हात घाण न करता मेकअप काढण्यासाठी काही चांगले व्हाईप्स हवे असतील तर तुम्ही मेकअप वाईप्स निवडताना काय काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-
१) क्लिन्झिंग एजंट – कोणताही मेकअप वाईप्स निवडताना त्या मेकअप वाईप्समध्ये नक्की काय आहे हे नीट पाहून घेणे गरजेचे आहे. आपण घेत असलेल्या मेकअप वाईप्समध्ये चांगले क्लिन्झिंग एजंटस आहेत का? आपल्या चेहऱ्याला शोभतील असे क्लिन्झिंग एजंट त्यात असतील तर ते चेहरा चांगला ठेवण्यासाठी मदत करतील. हा विचार आधी करा आणि मगच वाईप्स निवडा.
२) मॉश्चरायझिंग एजंट – मेकअप काढणाऱ्या मेकअप वाईप्समध्ये प्रामुख्याने मॉश्चरायझिंग एजंट असायला हवेत. कारण ज्या मेकअप वाईप्समध्ये मॉश्चरायझिंग एजंट आणि इसेन्शिअल ऑईल्स असतातत. त्या वाईप्सच्या सहाय्याने मेकअप काढल्यानंतर चेहरा अधिक चांगला राहतो. त्यामुळे तुम्ही मॉश्चरायझिंग एजंट असलेले वाईप्स निवडा असा सल्ला आम्ही देऊ.
३) नॅचरल्स ऑईल्स – चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी स्किन रगडून फायदा नाही. त्यासाठी मेकअप वाईप्समध्ये इसेन्शिअल ऑईल्स असतात तेच फायदेशीर ठरतात. त्यामुळे हा घटक मेकअप वाईप्समध्ये आहे का ते पाहून निवड करा. शिवाय मेकअप वाईप्समध्ये व्हिटॅमिन E, टी ट्रि ऑईल्स असे काही घटक असतात. जे तुमच्या चेहऱ्यावरुन मेकअप तर काढतातच पण त्या व्यतिरिक्त चेहऱ्याला मेकअपमुळे रॅशेश येणार नाही याची काळजीही घेतात.
० चेहऱ्यावरीवल मेकअप काढताना काय काळजी घ्याल?
१) मेकअप लावलेला चेहरा स्वच्छ करताना आधी मेकअप व्यवस्थित काढणे फार गरजचेचे असते. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी वाईप्सचा उपयोग फार महत्वाचा आणि तितकाच फायद्याचा ठरतो.
२) यासाठी चेहऱ्यावर मेकअप वाईप्स फिरवून घ्या. त्याने जितका सहज आणि हलक्या हाताने मेकअप काढता येतो तेवढा मेकअप काढा.
३) मेकअप काढण्यासाठी कधी कधी एकाहून अधिक मेकअप व्हाईप्स वापरावे लागले तर वापरा. एकच व्हाईप सतत चेहऱ्यावर फिरवू नका.
४) यानंतर आपला चेहरा चांगला फेसवॉश करुन घ्या.