डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी असे लावा अंडर आय क्रीम; जाणून घ्या स्टेप्स
हॅलो आरोग्य ऑनलाईन। रोजची धावपळ, खाण्या पिण्याच्या बदलत्या सवयी, त्यात मित्र मैत्रिणींसोबत चाललं करायचं म्हणून लागलेल्या सवयी यांमुळे आपले जीवन किती बदलून गेले आहे हे आपणही सांगू शकत नाही. वेळ आणि पैसे या दोन अश्या गोष्टी झाल्या आहेत कि कितीही मिळाल्या तरीही कमीच वाटतात. त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी वेळ नाही. परिणामी आरोग्याचे नुकसान आणि घटते जीवनमान. पण कितीही झालं तरी सुंदर दिसणे कुणाला आवडत नाही. पण पैश्याच्या मागे धावणारी आपण माणसं कितीतरी अश्या चुका करतो कि शारीरिक, मासिक आणि त्वचा यांपैकी कोणतेच आरोग्य आपण सांभाळत नाही.
पहा ना.. कामाच्या नादात आपण कमी झोप घेतो. परिणामी शारीरिक आरोग्याचे नुकसान होते. शिवाय मानसिक आरोग्याचेही नुकसान होते. इतकेच काय तर त्वचेचेसुद्धा नुकसान होते. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर दोस्तहो,कमी झोपेमुळे डोळ्यांवर ताण येतो आणि यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होतात. जी काही केल्या जात नाहीत. यामुळे आपला चेहरा निस्तेज दिसू लागतो. मुख्य म्हणजॆ, डार्क सर्कल्समुळे मेकअप न करता कुठेही बाहेर जात येत नाही. पण मेकअप डार्क सर्कल्स लपविण्याचा तात्पुरता उपाय झाला. बाकीच्यावेळी चेहऱ्याचे गेलेले तेज कसे मिळवालं? यासाठी आजकाल बाजारात अंडर आय क्रिम मिळते. जे नियमित वापरल्यास डार्क सर्कल्स कमी होतात. यामुळे नियमित स्किन केअर रूटिनमध्ये अंडर आय क्रिमचा समावेश करा. मात्र त्यासाठी अंडर आय क्रिम कसे लावावे हे माहित असणे गरजेचे आहे आणि हीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
० अंडर आय क्रिम लावण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत – चेहऱ्याच्या संपूर्ण त्वचेमध्ये अंडर आय जवळील त्वचा फार नाजूक आणि संवेदनशील असते. ज्यामुळे या भागात कोरडेपणा, सुरकुत्या, डार्क सर्कल्स, पफीनेस या समस्या लगेच निर्माण होतात आणि दिसूनही येतात. यासाठी डोळ्यांखालील त्वचेची विशेष काळजी घ्यायलाच हवी. यासाठीच जाणून घ्या अंडर आय क्रिम वापरण्याच्या योग्य स्टेप्स खालीलप्रमाणे:-
१) अंडर आय क्रिम लावण्यापूर्वी चेहरा, डोळे आणि डोळ्याखालील त्वचा फेसवॉश वापरून पाण्याने स्वच्छ करा. कारण क्रिम लावण्यापूर्वी त्वचेवर धुळ, माती, घाम, प्रदूषण अथवा मेकअपचे कण असता कामा नये. कारण यामुळे ते क्रिम त्वचेत मुरणार नाही. शिवाय अस्वच्छतेमुळे त्वचेला अॅलर्जी होऊ शकते. यासाठी अंडर आय क्रिम वापरण्यापूर्वी किमान मेकअप रिमूव्हरने डोळ्याखालील त्वचा पुसून घ्याच.
२) हाताच्या बोटावर मटारच्या दाण्याएवढी अंडर आय क्रिम घ्या. कारण, अंडर आय क्रिममध्ये चांगल्या परिणामासाठी उपयुक्त घटक वापरण्यात येतात. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त क्रिम लावण्याची गरज नाही.
३) बोटाचे टोक वापरून अंडर आय क्रिम डोळ्याखालील त्वचेवर सिम्पल डॉट अश्या पद्धतीने लावून घ्या.
४) डोळ्याच्या कोपरापासून क्रीम लावायला सुरुवात करा आणि भुवयांच्या टोकांपर्यंत हि क्रिम अंडर आय भागावर लावून घ्या.
५) अंडर आय क्रिम त्वचेत व्यवस्थित मुरेपर्यंत बोटांनी ते मसाज करत राहा.
६) अंडर आय क्रिम डोळ्यांमध्ये जाणार नाही याची विशेष काळजी घ्या. कारण जर ते डोळ्यात गेलं तर डोळ्यात जळजळ जाणवेल.
७) अंडर आय क्रिम त्वचेत मुरल्यावर कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट त्वचेवर लावता येते.
८) दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी स्किन केअर रूटिनमध्ये अंडर आय क्रिमचा समावेश करा.