गवती चहा सतत प्याल तर आरोग्याचे होईल नुकसान; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। एक असतात कॉफी लव्हर आणि एक असतात टी लव्हर. अनेकांसाठी चहा म्हणजे जणू प्रेमाचा विषयच. कितीतरी लोकांना चहा प्यायला इतका आवडतो कि सकाळ असो, दुपार असो नाहीतर रात्र असो किंवा मध्य रात्र कधीही उठून हे लोक चहा अगदी आवडीने पिऊ शकतात. त्यातच आरोग्यासाठी काही लोक खास चहांचे सेवन करतात. अश्याच एका आरोग्यदायी चहाविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. हा चहा आहे गवती चहा. गवती चहा ही एक अशी वनस्पती आहे, जी चहाची चव वाढवते. याशिवाय आरोग्याचीही काळजी घेते. त्यामुळे खूप जण अगदी आवर्जून गवती चहाचे सेवन करतात. पण एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे आरोग्याची हानी करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे जर तुम्हीही गवती चहाचे सेवन दररोज मनात येईल तेव्हा आणि तितक्यावेळा करत असाल तर त्याचे तोटे आधी जाणून घ्या आणि मगच त्याचे सेवन करा. याआधी ज्यांना गवती चहा म्हणजे नक्की काय हे माहित नाही त्यांच्यासाठी अधिक माहिती जाणून घेऊया –
० गवती चहा म्हणजे काय?
– गवती चहा ही एक अशी वनस्पती आहे जी अगदी गवतासारखी दिसते. म्हणूनच तिला गवती चहा म्हणतात. शिवाय गवती चहा घरच्याघरी कुंडीतदेखील उगवता येते. त्याची पाने मोडल्यानंतर त्याचा एक सुंदर सुगंध येतो. त्यामुळे गवती चहा वापरून चहा केल्यानंतर त्यामध्ये एक चांगला गंध येतो. थंडीत वा हिवाळ्यात गवती चहा प्यायल्यास शरीराला विशेष उर्जा मिळते.
० गवती चहाचे फायदे – गवती चहा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि पोटाचे आरोग्य चांगले करण्यासाठी फारच फायद्याचा ठरतो. मात्र त्याचे काही तोटे सुद्धा आहेत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
० गवती चहाचे तोटे – गवती चहाचे सेवन तुम्ही सतत करत असाल तर तुम्हाला साहजिकच त्याचे काही तोटे जाणवायला सुरुवात होतील. एखाद्या गोष्टीचा अतिरेक तुमच्या अवयवांवर खास परिणाम करत असतो. त्यामुळे त्याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका.
१) गवती चहाचे अति सेवन मोशनवर परिणाम करते. परिणामी जुलाब आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
२) गवती चहा अति प्रमाणात प्यायल्यामुळे शरीराला अधिक गरम पडू शकते. यामुळं;ए उष्णतेचे विकार आणि पोटाचे विकार होतात.
३) गवती चहा तोंडाचे विकार होण्यास कारणीभूत ठरतो. तोंड येणे, जीभ फुटणे असे दाहविषयक त्रास गवती चहामुळे होतात.
४) गवती चहाचे अति सेवन केल्यास त्वचेवर परिणाम होतो. चेहऱ्यावर पुरळ येते आणि चेहरा निस्तेज होतो.