तजेलदार त्वचेसाठी ‘हे’ पदार्थ खाणे आवश्यक; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपली त्वचा म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा. त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. खरंतर प्रत्येकाच्या त्वचेचा वेगवेगळा पोत असतो. कुणाची त्वचा तेलकट तर कुणाची कोरडी, कुणाची मऊ तर कुणाची रूक्ष. पण तुमची त्वचा कशी का असेना तिची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मग आता त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण काय करू शकतो असा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, अगदी महागडी सौंदर्य उत्पादने वापरून त्वचा सुंदर होत नाही. तर आपल्या आहारात अगदी लहानसे बदल केले तरीही खूप मदत होते. म्हणूनच आम्ही तुम्हाला आज अश्या पदार्थांची ओळख करून देणार आहोत जे पदार्थ तुम्हाला माहित आहेत पण ते तुमच्या त्वचेची काळजी घेण्यास सक्षम आहेत हे तुम्ही जाणत नाही. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) पाणी – आपल्या त्वचेला तुकतुकीत, लवचिक आणि कोरडे होण्यापासुन वाचवायचे असेल तर त्वचेला रोज माॅश्चराइझ करायला हवे. यासाठी रोज पुरेश्या प्रमाणात पाण्याचे सेवन करा. अन्यथा त्वचा थकलेली आणि कोरडी दिसायला लागते. म्हणूनच जर स्वस्थ त्वचा हवी असेल तर दिवसातुन कमीत कमी सहा ग्लास पाणी प्या.
२) पालक – खूप काम करणे, थकवा येणे आणि पुरेशी झोप न घेणे यांमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल निर्माण होतात. हे डार्क सर्कल घालवण्यासाटःई दररोजच्या आहारात पालक समाविष्ट करा. कारण कोणत्याही हिरव्या भाज्या चेहरा उजळून काढण्यासाठी मदतयुक्त भूमिका निभावतात.
३) लालभोपळा – लालभोपळा काही भागांत डांगर म्हणून ओळखला जातो. या भोपळ्यातील कैरोटिनोईड चेहे-यावर लवकर सुरकुत्या येऊ देत नाही. इतकेच नव्हे तर रॅडीकल्सशी सुध्दा लढतं. याशिवाय चेहऱ्याला चांगला आकार आणि त्वचेचे स्वास्थ्य निरोगी ठेवण्यात लालभोपळा सहाय्यक आहे. तसेच लालभोपळयात असलेले व्हिटामीन सी आणि दुसरे अॅंटी एजिंग व्हिटामीन त्वचेला आतून स्वच्छ ठेवतात.
४) लसूण – लसूण अत्यंत उपयोगी औषधी आहे जी प्रत्येक घरात आढळते. हि लसूण चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम आणि सुरकुत्या घालवण्याकरीता मदत करते. कारण लसणीमध्ये रक्त शुद्ध करणारे गुणधर्म असतात. म्हणून दररोज सकाळी १-२ लसणाच्या पाकळ्या चावून खा आणि टवटवीत त्वचा मिळवा.
५) टोमॅटो – टोमॅटोमध्ये विटामिन ए, विटामिन सी आणि पोटॅशियम असते. यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या उजळण्यासाठी टोमॅटो खाणे लाभदायक आहे. याशिवाय टोमॅटो लाईकोपिन नावाच्या अॅंटीआॅक्सीडेंटने समृद्ध असतो. जो आपल्या त्वचेत नैसर्गिकरित्या SPF’ला वाढवतो आणि त्वचा स्वस्थ तितकीच उजळ दिसते.
६) गाजर – गाजरात कैरोटीनोईड जास्त प्रमाणात असते. जे आपल्या त्वचेला तजेलदार बनविण्यास मदत करते. गाजर त्वचेच्या बाह्य आवरणाला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्याचे कार्य करत असते. यामुळे गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
७) डाळींब – डाळींबात बरेचसे अॅंटीआॅक्सीडेंट असतात. जे कितीतरी अनेक दुस-या फळांमध्ये मिळत नाहीत. त्यात जेव्हा स्वस्थ त्वचेचा प्रश्न असतो तेव्हा डाळिंब विसरून कसे चालेल. कारण डाळिंब आपल्या त्वचेला सुंदर तितकेच टवटवीत ठेवण्याचे कार्य करते. डाळिंब खाल्ल्यामुळे त्वचेचा पोत निरोगी राहतो.
८) अंडे – अंडे प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहे. म्हणून दररोज एक अंडे खाणे शरीरासाठी लाभदायी असते. याशिवाय अंड्यामध्ये विटामिन बी ७ भरपूर असते. त्यामुळे हे त्वचेसाठी देखील लाभदायक असते. त्वचेसाठी अधिक चांगले परिणाम मिळवायचे असतील तर उकडलेलया अंड्याच्यावरील भाग खा आणि अंड्याच्या आतील पिवळा भाग खाणे प्रामुख्याने टाळा.