श्वास घेताना त्रास होत असेल तर…?; जाणून घ्या घरगुती उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। श्वास घेताना त्रास होणे, छातीत दुखणे, डोकं दुखणे अश्या समस्या जर जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. मित्रांनो या समस्येमागील मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन न मिळणे. होय. कारण शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही तर याचा ताण आपल्या फुफ्फुसांवर येतो. परिणामी फुफ्फुसांवर अनावश्यक दबाव पडतो आणि यामुळे श्वास घेण्याची गती वाढते. याला श्वास न पुरणे, डाँ लागणे, धाप लागणे वा श्वास घेण्यात अडचण निर्माण होणे असे म्हटले जाते. तसे पाहाल तर हि समस्या फारच सर्वसामान्य आहे. शिवाय ह्या समस्या कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतात. परंतु दीर्घकाळापर्यंत छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास अडचण येणे हि एखाद्या गंभीर रोगाची लक्षणे असू शकतात. जर आपल्यालाही श्वास घेण्यात समस्या येत असेल तर आज आम्ही तुम्हाला गंभीर स्थितीची लक्षणे आणि यावर करावयाचे घरगुती उपाय सांगणार आहोत. पण लक्षात ठेवा हि समस्या कोणत्याही उपायांनी बारी होत नसेल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे हे समजून घ्या.
० लक्षणे
– दीर्घ श्वास घेता न येणे.
– अंगभर घाम येणे
– छातीत कला जाणे/ छातीत दुखणे
– श्वास घेताना ऑक्सिजनची कमतरता जाणवणे
– शासोच्छ्वासाची क्रिया करताना उर भरून आवाज येणे
० घरगुती उपाय
१) तुळस – आपल्याकडे तुळशीला एक विशेष महत्व आहे. शिवाय आयुर्वेदातही तुळशीला महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. कारण तुळशीतील अनेको औषधीय गुणधर्म अनेको आजारांवर प्रभावी रित्या काम करतात. यात दमा वा श्वास घेण्यात समस्या येत असेल तर तुळशीची ५-१० पाने रोज सकाळी उपाशी पोटी खावी. दुसरा उपाय म्हणजे तुळशीच्या पानांचा रस, मध आणि आल्याचा रस एकत्र करून दम लागलेल्या व्यक्तीला पिण्यास द्या. हा उपाय दररोज केल्याने श्वासंबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
२) लसूण – आपल्या प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाक घरात हमखास मिळणारी लसूण श्वासासंबंधित समस्यांवर परिणामकारक उपाय आहे. कारण लसणाच्या सेवनाने बॅक्टेरिया, पोटदुखी, सर्दी, खोकला आणि ताप अगदी काहीच काळात दूर होतो. म्हणून श्वास घेण्यात समस्या येत असतील तर संबंधितांनी दररोज सकाळी लसणाच्या फक्त २ पाकळ्या रिकाम्या पोटी चावून खाव्यात आणि यावर कोमट पाणी प्यावे.
३) लवंग आणि ओवा – मसाल्याच्या डब्यात खडा मसाला म्हणून आढळणारी लवंग आणि ओवा अनेको रोगांवर औषधी म्हणून वापरले जाते. श्वासासंबंधीत कोणतीही समस्या या उपायासमोर काहीच नाही. यासाठी लवंग आणि ओवा यांचे मिश्रण दररोज १ चमचा घ्या. याशिवाय ओव्याचा धूर देखील छातीत दुखणे आणि श्वाससंबंधी विकारांमध्ये उपयोगी आहे. यासाठी गरम तव्यावर चमचाभर ओवा टाका आणि त्यातून निघणारा धूर नाकाद्वारे शरीरात ओढा. परंतु ओवा जास्त जळला तर तो काढून नवीन ओवा टाकून त्याचा धूर घ्या. हा उपाय श्वास घेण्यात अडचण येणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयोगी आहे.
४) वाफारा – ज्या व्यक्तीला श्वास घेण्यात अडचण येत असेल त्यांनी एका भांड्यात पाणी टाकून त्याला उकळा. आता ह्या पाण्यातून निघणारी वाफ नाक आणि तोंडाद्वारे शरीरात खेचा. अशी गरम पाण्याची वाफ शरीरात गेल्याने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. याशिवाय जर आपल्याकडे वाफ घेण्यासाठी व्हेपोरायझर मशीन असेल तर त्याचा ही उपयोग करता येईल. हा उपाय अगदी सोप्पा आणि तितकाच फायदेशीर आहे.
० अचानक श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली तर काय कराल?
१) पिडीत व्यक्तीला टेका लाऊन सरळ बसवा.
२) पीडिताला शांत करा.
३) पिडीताने टाईट कपडे परिधान केले असतील तर ते काढायला लावा. अथवा कपडे सैल करा.
४) पीडित आधीपासून श्वाससंबंधी औषध घेत असेल तर ती औषधे त्वरित द्या.
५) जोपर्यंत योग्य मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला एकटे सोडू नका.
६) या स्थितीदरम्यान पीडित व्यक्तीच्या हृदयाची धडधड व श्वास सतत तपासत रहा.
७) संबंधित व्यक्तीला लांब लांब श्वास घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगा.