|

ह्या सवयी दर्शवितात भक्कम मानसिक स्थिती; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मानसिकदृष्ट्या भक्कम किंवा रूपानं मजबुत असणं म्हणजे काय ओ? तुम्हाला माहित आहे का? नाही? मग आम्ही सांगतो. पण हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा लागेल. मानसिकरीत्या भक्कम असणे म्हणजेच आपल्याला कोणत्यावेळी काय हवे आहे? किंवा काय हवे हे कसे मिळवायचे? या दोन्ही प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे असणे. जेव्हा ठरवलेले लक्ष्य साधण्यासाठी कोणत्याही गोष्टीला मागे न सोडणं हि मानसिकता तयार होते तेव्हा आपण मानसिकदृष्ट्या भक्कम आहोत असे म्हटले जाते. याशिवाय मानसिक मजबुती म्हणजेच पुढे येणाऱ्या चांगल्या वाईट प्रत्येक परिस्थितीचा अंदाज आधीच घेउन मार्गस्थ होणे होय. जर तुम्हाला वाटत असेल कि तुम्ही मानसिकरीत्या भक्कम वा मजबूत आहात तर ते नक्की कसे ओळखालं? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.

मानसिक सुदृढता व्यक्तीला विशेष सकारात्मक शक्ती प्रदान करते. कारण मानसिकरित्या मजबुत असणाऱ्या व्यक्ती बुद्धिशाली आणि तितक्याच तेजस्वी व शक्तीशाली असतात. कारण त्यांना नेहमी याची जाणीव असते की आयुष्यात सगळच आपल्याला हवं तसं आणि आपल्या मनासारखं होत नाही. यामुळे अश्या व्यक्ती मानसिकदृष्टया मजबुत राहण्यासाठी नेहमी योग्य विचारांची संगती करतात. काहींमधे मानसिक शक्ती नैसर्गिक असते. तर काहींनी हि शक्ती मिळवावी वा आत्मसाद करावी लागते. आपण जाणून घेऊया मानसिकरीत्या भक्कम असणाऱ्या व्यक्तींच्या मुख्य सवयी. ज्या त्यांची मानसिकता मजबूत आहे हे दर्शवतात.

१) बदलांची सहज स्विकृती – मानसिकरित्या मजबुत असणारे लोक बदलांना सहज स्विकारतात आणि सकारात्मकतेणे त्यांचं स्वागत करतात. बऱ्याच लोकांना बदल आवडत नाहीत परंतु बरेचदा बदल अनिवार्य असतात. जे पचविण्याची ताकत मानसिकदृष्ट्या भक्कम लोकांमध्ये असते.

२) भावनांवर नियंत्रण – मानसिक स्थिती मजबूत असणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांच्या भावना त्यांच्याच नियंत्रणात असतात. त्यामुळे जोपर्यंत त्यांना वाटत नाही तोपर्यंत त्यांना कुणीही दुःखी करू शकत नाही. यामुळे त्यांना ठाऊक असते कि, नकारात्मक परिस्थितीवर काय प्रतिक्रिया दयावी.

३) स्वतःसाठी माफीची अपेक्षा नाही – अश्या व्यक्तींजवळ कधीही अपराधीपणाची भावना उपजत नाही. त्यामुळे याना स्वतःसाठी माफीची अपेक्षाच नसते. त्यांना ठाऊक असतं की आयुष्य साधं, सरळ, सोपं नाही. त्यामुळे अश्या गोष्टींचा विचार आणि अपेक्षा व्यर्थ आहे.

४) सगळ्यांना आनंदी ठेऊ शकत नाही – मानसिक रूपाने मजबूत लोक सगळयांना खुश ठेवू शकत नाहीत. कारण जर कधी ‘नाही’ म्हणण्याचा प्रसंग असेल तर ते संकोच न करता नाही म्हणतात. आपल्या मनातील विचारांना, मनातील गोष्टींना सांगतांना ते जराही लाजत नाहीत उलट ते साधे आणि सरळ राहणे पसंत करतात. त्यामुळे अश्या व्यक्तींच्या बाबतीत अनेकांचा नाराजीचा सूर दिसतो.

५) जराही चिंता नाही – ज्या गोष्टींना मी बदलु शकत नाही त्यांना स्विकारण्याची ताकद देवाने मला दिली आहे आणि ज्या गोष्टी मी बदलु शकतो त्या बदलण्याची मला हिम्मत दिली आहे, अश्या मानसिकतेचे हे लोक असतात. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाची त्यांना चिंता वाटत नाही.

६) सुनियोजीत जोखीम – मानसिकरीत्या मजबूत असणारे लोक सर्व परिस्थितीचा दोन्ही अंगांनी विचार करतात आणि त्याचे निरीक्षण करतात. यानंतर परिस्थिती संबंधीत निर्णय पुर्णपणे विचार करून घेतात. यामुळे सुनियोजीत जोखीम घेतांना मानसिक दृष्टया मजबुत लोक विचलीत होत नाहीत.

७) चुकांपासुन धडा – या व्यक्ती स्वतः केलेल्या चुकांची जबाबदारी स्वतःच घेतात आणि भुतकाळात या चुकांपासुन धडादेखील घेतात आणि यामुळेच भुतकाळातील घडुन गेलेल्या चुका त्यांच्याकडुन पुन्हा होण्याची शक्यता फारच कमी असते.

८) भुतकाळाचा विचार नाही – भुतकाळाविषयी विचार करणे हि या व्यक्तींची वृत्ती नाही. त्यामुळे मानसिक रित्या मजबुत लोक कधीही भुतकाळाचा विचार करत वेळ व्यर्थ घालवत नाहीत. उलट भुतकाळातील आपल्या भुमीकेचे निरीक्षण करतात आणि त्यातुन काय शिकले हे सांगतात. अश्याप्रकारे हे लोक वर्तमानात जगतात आणि भविष्यासाठी योजना आखतात.

९) असुया बाळगत नाही – मानसिकरित्या मजबुत व्यक्तीला स्वतःवर पुर्ण विश्वास असतो. त्यामुळे कोणी त्याच्या पुढे निघुन गेला म्हणून त्याच्या मनात कधीही असुयेची भावना निर्माण होत नाही. अश्या वेळी एक मानसिक बुध्दीमान व्यक्ती वाईट वाटुन घेण्याऐवेजी यशस्वी होण्याकरता लागणाऱ्या परीश्रमाची किंमत जाणतो.

१०) अतिघाई कधीच नाही – मानसिक रूपाने मजबुत व्यक्ती प्रत्येक गोष्टीला परिपूर्ण वेळ देते. दरम्यान पुर्ण परिश्रम, एकाग्रता आणि बुध्दीमत्तेची सांगड घालून हे लोक काम करतात आणि एकच तत्त्व बाळगतात. ते म्हणजे, “सब्र का फल मिठा होता है”।

११) एकटं राहण्याची भीती नाही – मानसिकरित्या मजबूत व्यक्ती कोणत्याही इतर व्यक्तीत गुंतून राहत नाही. उलट स्वतःसोबत राहणे पसंत करतात. त्यामुळे एकटं राहण्याला या व्यक्ती कधीही घाबरत नाहीत. कारण हे लोक आनंदाकरता दुसऱ्यावर अवलंबुन नसतात.

१२) हार मानत नाही – अयशस्वी होणे वा हार मानुन प्रयत्न सोडणे अशी वृत्ती हे लोक जोपासत नाहीत. उलट अयशस्वी होण्याला ते पुढे जाण्याची संधी समजतात आणि आणखी परिश्रम करून यशाचे शिखर गाठतात.