| |

‘या’ अवयवांना सतत स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरू शकते घातक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जगात अशी कोण व्यक्ती आहे जिचे स्वतःवर प्रेम नाही…? बहुतेक असे कुणीच नाही. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःची काळजी घेण्यात मग्न दिसते. काहीजण यासाठी अपवाद आहेत. कारण बदलती जीवनशैली त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच देत नाही. पण मित्रांनो, आपल्या शरीराचे सर्व अवयव स्वच्छ ठेवणे हि आपल्या आरोग्याची गरज आहे. कारण आपण जिवंत असेपर्यंत सावली आणि अवयव हे दोन्ही आपले खरे जोडीदार असतात. परंतु, शरीराचे असे अनेक अवयव आहेत. ज्यांच्यावर सतत बॅक्टेरिया जमा होतो. हे अवयवय इतके नाजूक असतात की, यांवर बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यास आरोग्याचे नुकसान होते. चला तर जाणून घेऊया शरीराच्या कोणत्या अवयवांना सतत स्पर्श करू नये:-

१) तोंड – जेवणानंतर दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी तोंडात हात घालू नये. तसेच ओठांना सारखा हात लावू नये. यामुळे हातांवरील बॅक्टेरिया तोंडात जातात. तोंडातील बॅक्टेरिया हाता- बोटांना लागतात. यामुळे तोंडाची दुर्गंधी, दातांचे दुखणे आणि दातांमध्ये किड अशा समस्या होतात.

२) नाक – नाकात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात. त्यामुळे नाकात बोट घालण्याची सवय घातक आहे. यामुळे नाकातील बॅक्टेरिया बोटांना आणि हातांना लागतात. नाकातील हे बॅक्टेरिया श्वासाच्या माध्यमातून फुफ्फुसात जातात आणि अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

३) नख – नखाच्या आतल्या बाजूस अनेक घातक बॅक्टेरिया असतात. यामुळे नखांमधील बॅक्टेरिया जेवताना पोटात गेल्याने तोंडांचे आणि पोटाचे विकार होऊ शकतात.

४) बोट – बोटांमध्ये आणि हातांवर रस्त्यावरील धूळ आणि माती यांमुळे बॅक्टेरिया जमा होतात. यामुळे बोट डोळ्यांना लावल्यास बॅक्टेरियांमुळे डोळ्यांमध्ये खाज येणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होणे अशा समस्या होतात.

५) पिंपल्सयुक्त चेहरा – पिंपल्सला सतत हात लावल्याने यातील बाहेर पडणाऱ्या पाण्यातून वेगवेगळे हानिकारक बॅक्टेरिया चेहऱ्याच्या इतर भागांवर पसरतात. यामुळे अन्य ठिकाणीही पिंपल्स येतात.