| | |

फक्त १ ग्लास गरम दूध स्त्रियांसाठी आरोग्यदायक; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दिवसभर घरातल्या प्रत्येकासाठी तीळ तीळ व्यग्र असणारी स्त्री. कधी लेक, कधी मैत्रीण, कधी बायको, कधी सून आणि कधी आई म्हणून इतरांची काळजी घेण्यात रमून गेलेली असते. या सगळ्यात तिला स्वतःकडे पहायलासुद्धा वेळ मिळत नाही हेच काय ते दुर्दैव. त्यात आजची स्त्री घर, मुलं आणि बाहेरच जग उत्तररित्या सांभाळते पण या सगळ्यात तिच्या आरोग्याची काळजी घ्यायला मात्र ती विसरते. तुम्हालाहि वाटतं ना तुमच्या ताईने, आईने किंवा बायकोने स्वतःची काळजी घ्यायला हवी. मग आज आम्ही असा एक उत्तम उपाय सुचवणार आहोत ज्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार नाहीत मात्र तुमच्या आयुष्यातील त्या प्रिय स्त्री ची तुम्ही काळजी घेऊ शकाल.

हा उत्तम पर्याय आहे गरम दूध. होय. कारण दुधात उपस्थित पौष्टिक घटक गरम केल्याने अनेक पटीने वाढतात. त्यात दूध स्वतःच एक पूर्ण अन्न आहे. दुधात प्रथिने, फॅट, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, बी -2, बी -12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारखे अनेको पौष्टिक घटक असतात. जे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहेत. मुख्य म्हणजे गरम दूध कधीही पिता येते. त्याचा स्वाद वाढवण्यासाठी काही मसाले आणि सुका मेवा वापरता येईल. माहितीनुसार, १ कप गरम दुधात १२ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. जी आपले स्नायू आणि मेंदू मजबूत करते. शिवाय यातील प्रथिने स्नायूंना मजबूत करतात. त्यामुळे स्त्रियांसाठी दूध अमृत आहे असे म्हणायला हरकत नाही. चला तर जाणून घेऊयात फायदे-

१) भक्कम हाडे – कोमट दूध पिण्यामुळे दुधातील पोषण वाढते. गरम दुधात असणारे एन्झाईम्स सक्रिय झाल्यास हाडांची घनता सुधारते. यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

२) मजबूत दात – दात किडणे आणि श्वासोच्छवासामुळे त्रास होत असेल तर दररोज गरम दूध पिणे मदत करेल. गरम दुधामुळे दात बळकट होतील आणि दात किडण्याचा धोका कमी होईल. तसेच दुधामध्ये बायोएक्टिव्ह घटक असतात, जे सूक्ष्मजीव वाढण्यास प्रतिबंध करतात.

३) वजन घटते – साधारण १ ग्लास उबदार दूध पिणे, विशेषत: झोपेच्या वेळी पोट बराच वेळ भरलेले राहते. हे आपल्याला रात्री उशिरा होणार्‍या आरोग्यासाठी स्नॅकिंग टाळण्यास मदत करते. परिणामी वजन कमी होते.

४) रक्तातील साखरेवर नियंत्रण – रात्री झोपण्याआधी १ कप कोमट दूध कोणत्याही मिठाईशिवाय प्या. यामुळे रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यास मदत होते आणि प्रकार १ मधुमेह असणाऱ्यांना लाभ होतो. तसेच ज्यांना रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार आहे त्यांनी हा प्रयोग नक्की करावा.

५) गाढ झोप – गरम दूध मन आणि शरीर याना आराम देते. म्हणून झोपण्याआधी १ ग्लासभर कोमट दुधाचे सेवन करावे. यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते आणि सुधारते. परिणामी निद्रानाशाच्या समस्येवर लाभ मिळतो.