पुदिन्याची पाने कशीही खाल्ली तरीही आरोग्यासाठी लाभदायक; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। पुदिना ज्याला आपण मिंट म्हणून ओळखतो. या पुदीनाची पाने प्रामुख्याने चटणी बनवण्यासाठी वापरली जातात. हि चटणी अन्नाची चव दुप्पट करतेच पण आरोग्यालादेखील जपते. होय. पुदिन्याची पाने अशीच चावून खा किंवा चटणी बनवून खा. कोणत्याही स्वरूपात ती खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदाच होतो. इतकेच नव्हे तर शतकानुशतके पुदीना आयुर्वेदात औषध म्हणून वापरला जातोय. कारण पुदीनाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहेत. चला तर जाणून घेऊयात पुदिना खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे कोणते? खालीलप्रमाणे:-
० पुदीना देईन आरोग्याचे फायदे
१) नाक चोंदणे / बंद होणे – सर्दीमुळे नाक बंद झाले असेल तर ताज्या पुदीनाच्या पानांचा वास घ्या. याशिवाय पुदिन्याची पाने बारीक चिरून १ ग्लास पाण्यात उकळून हा चहा प्या. यामुळे सर्दीही दूर होते आणि नाकदेखील मोकळे होते.
२) पोटाच्या समस्या – पोटात अपचन वा गॅसची समस्या झाल्यास १/२ चमचा पुदीनाचा रस १ कप गरम पाण्यात मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे लगेच आराम मिळतो. याशिवाय पोटात गर्मी पडली असेल तर हा दाह शांत होतो आणि आराम मिळतो.
३) तीव्र पोटदुखी – अचानक पोटदुखीचा त्रास जाणवल्यास पुदीनाची ५-१० पाने, १ चमचा जिरे, १/२ चमचा मिरपूड आणि १/४ चमचा हिंग एकत्र मिसळावे आणि हे मिश्रण खावे. यामुळे लगेच पोटदुखीपासून आराम मिळतो.
४) कॉलरा – कॉलराच्या समस्येमध्ये आराम मिळवायचा असेल तर पुदीना, कांद्याचा रस आणि लिंबाचा रस तिन्ही समान प्रमाणात मिसळून याचे एक मिश्रण तयार करा. हे मिश्रण उपाशी पोटी खा. यामुळे कोलेरामध्ये लवकर आराम मिळतो आणि प्रकृतीत सुधारणा होते.
५) अंगाला खाज – अंगाला खाज सुटणे किंवा घसा खवखवणे यापासून आराम मिळावा म्हणून पुदीनाचा काढा करून प्या. यासाठी १ कप पाण्यात १० ते १२ पुदीनाची पाने घाला आणि हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या. यानंतर हे पाणी गाळून यात १ चमचा मध टाकून सेवन करा. यामुळे लगेच आराम मिळेल.
६) तोंडाची दुर्गंधी – तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी दररोज पुदीनाची २-३ पाने चावून त्याचा रस येईपर्यंत चघळा. यानंतर पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. असे दररोज न चुकता केल्यास तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्तता मिळेल.
७) सन बर्न – वाढती गर्मी किंवा सूर्यकिरणांमुळे त्वचेला दाह जाणवत असेल तर चेहऱ्यावर ताजी पुदीना पाने बारीक करून लावा. यामुळे चेहरा थंड होतो आणि स्किन बर्न होत नाही.
८) डागविरहित त्वचा – त्वचा तेलकट असेल तर पुदीनाचे फेशियल तयार करून वापराने फायद्याचे ठरते. यासाठी २ चमचे ताजा पुदीनाची बारीक पेस्ट, २ चमचे दही आणि १ चमचा ओट्सचे पीठ घाला. यानंतर हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. सुमारे १० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या चमकेल.