सुपारीचा एक तुकडासुद्धा आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। पान-मसाल्यामध्ये सुपारीचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि यामुळे सुपारी थोडी का होईना बदनाम आहे. पण मित्रांनो इतकी नाव आपण सुपारीला ठेवतो तितकी काही सुपारी वाईट नाही हा. असे म्हटले जाते कि मला तर सुपारीच्या खंड्याचही व्यसन नाही. पण तुम्हाला माहित आहे का? सुपारी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे व्यसन म्हणून नाही पण आरोग्यासाठी लाभ म्हणून सुपारी खायला हरकत ती काय?चला तर आज आपण जाणून घेऊयात सुपारीच्या खास फायद्यांविषयी.
० सुपारी खाण्याचे फायदे :-
१) वेदनांपासून आराम – सुपारीच्या सेवनाने पाठदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. कारण सुपारीच्या आढळणारे औषधी गुणधर्म स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. यामुळे स्नायूंच्या वेदना आणि कडकपणापासून त्वरीत आराम मिळतो.
२) बद्धकोष्ठतेवर परिणामकारक – सुपारीच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यासाठी दररोज सुपारीचे १-२ छोटे तुकडे खाल्ल्याने विषारी घटक शरीरातून बाहेर पडतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
३) पोटाच्या समस्या – पोटाशी संबंधित कोणतीही आणि कितीही मोठी समस्या असली तरीही सुपारीचे सेवन यावर आराम देण्यास सक्षम आहे. यासोबतच सुपारी पचनसंस्था मजबूत करण्यात विशेष भूमिका बजावते.
४) खाज खुजली गायब – एखादी ऍलर्जी असल्यास शरीराच्या कोणत्याही भागावर खाज येत असेल तर यापासून आराम मिळवण्यासाठी सुपारी मदत करते. यासाठी तीळ तेलात सुपारीची बारीक पावडर करून मिसळावी आणि याची पेस्ट बनवून खाज येत असणाऱ्या भागावर लावावी.
५) अल्सरवर मात – तोंडाच्या व्रणांपासून अर्थात अल्सरपासून आराम लावायचा असेल तर सुपारी गुणकारी उपाय आहे. यासाठी सुपारीची पावडर तेलात मिसळून लावावी किंवा सुपारी चघळून खावी. याशिवाय सुपारीसोबत कच्चे पान देखील खाऊ शकता.
६) दातांसाठी फायदेशीर – सुपारीमध्ये एन्थेलमिंटिक असते जे दातांमधील पोकळी काढून टाकून दात मजबूत करण्यास मदत करते. यासह, सुपारी पावडरचा वापर दातांचा पिवळापणा दूर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.