प्रेग्नेंसीशी संबंधित ‘ओव्ह्युलेशन’ प्रक्रिया म्हणजे काय?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। स्त्री महिन्यातून ज्या दिवसांत सर्वाधिक प्रजननक्षम असते, त्या दिवसांना ओव्ह्युलेशन डे म्हणतात. या दिवसात निरोगी गर्भधारण करता येतो. यामुळे प्रजननात ओव्ह्युलेशन हि प्रक्रिया महत्वाची मानली जाते. परंतु ओव्ह्युलेशनबद्दल खूप गैरसमज आहेत. अनेकांना अजूनही या प्रक्रियेची माहिती नाही. ओव्ह्युलेशनव्यतिरिक्त अन्यही अनेक घटक आहेत, की जे स्त्री गर्भवती होण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात; मात्र त्यामध्ये ओव्ह्युलेशनचं कार्य सर्वांत महत्त्वाचं आहे. चला तर जाणून घेऊयात कि ओव्ह्युलेशन म्हणजे काय? आणि इतर आवश्यक माहिती खालीलप्रमाणे:-
० ओव्ह्युलेशन म्हणजे काय?
– ओव्ह्युलेशन स्त्रीच्या शरीरातील प्रजनन चक्राचा महत्त्वाचा भाग आहे. त्यावेळी अंडाशयातून बीजांड बाहेर पडून ते फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं. पुरुषाच्या वीर्यातून आलेल्या शुक्राणूकडून बीजांडाचं फलन होतं, तेव्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये भ्रूण तयार होतो. नंतर तो यूटेरसमध्ये जाऊन गर्भ म्हणून विकसित होतो. शुक्राणूंकडून बीजांडं फलित झालं नाही, तर अशी अफलित बीजांडं नंतर मासिक पाळीवेळी होणऱ्या रक्तस्रावातून बाहेर पडतात.
– सोप्प्या भाषेत ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रियांमधील बीजांडकोश फुटून स्त्री बीज बाहेर येण्याची क्रिया.
० ओव्ह्युलेशन डे कसा ओळखालं?
– मासिक पाळीच्या १३-१५ दिवस आधी ओव्ह्युलेशन होतं. पण, प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीचे चक्र वेगळे असते. त्याप्रमाणे प्रत्येकवेळी ओव्ह्युलेशनची वेळ बदलू शकते. मासिक पाळीचे चक्र २८ दिवसीय असेल तर १४वा दिवस ओव्ह्युलेशनचा सतो. त्याआधीचे दोन-तीन दिवस हे गर्भधारणेची सर्वांत जास्त शक्यता असलेले असतात.
० ओव्ह्युलेशन प्रक्रियेची लक्षणे
– ओव्ह्युलेशनची लक्षणं प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळी असतात. यात प्रामुख्याने खालील लक्षणे आढळतात.
१) सौम्य दुखी जाणवते.
२) स्पॉटिंग होऊ शकतं.
३) संभोगाची इच्छा वाढते.
४) स्तनांमध्ये नाजूकता येते.
५) व्हजायनामधून बाहेर पडणाऱ्या स्रावाचं प्रमाण वाढतं.
६) व्हजायनामधून बाहेर पडणारा पांढरा स्त्राव निर्मळ आणि एग व्हाइटप्रमाणे बुळबुळीत असू शकतो.
७) याव्यतिरिक्त ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी, बेसल बॉडी टेम्परेचर (शरीराचं तापमान), ओव्ह्युलेशन प्रेडिक्शन किट्स, ओव्ह्युलेशन इंडिकेटर अॅप्लिकेशन्स आदींच्या माध्यमातून किंवा ट्रॅकिंग कॅलेंडर ठेवून ओव्ह्युलेशनचा कालावधी ओळखता येतो.