स्क्रब करताना या चुका टाळा नाहीतर त्वचेचे नुकसान निश्चित; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण इतरांपेक्षा सुंदर आणि तेजस्वी दिसावे असे कुणाला वाटत नाही? तुम्हाला वाटत नाही? मग यासाठी आपण काय करतो, आपल्या त्वचेची कशी निगा राखतो, कशी काळजी घेतो या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आपला चेहरा सतेज, नितळ आणि सुंदर दिसावा यासाठी प्रेत्येकाने त्वचेच्या पोतानुसार त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी बाजारातून महागडे प्रॉडक्ट वा पार्लरची गरज आहे असे काही नाही. आजकाल कितीतरी विविध घरगुती उपायांच्या मदतीने आपलया त्वचेचा पोत राखता येतो. विशेषतः स्क्रब करणे हि आपल्या त्वचेची गरज आहे. कारण सतत धूळ, माती आणि प्रदूषण यांमुळे चेहऱ्याची त्वचा हळूहळू निस्तेज दिसू लागते. यासाठी स्क्रब आणि यानंतर फेसपॅक लावणे फायद्याचे ठरते. पण मैत्रिणींनो यासाठीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं.
चेहऱ्यावर साचलेली धूळ, माती, डेड स्कीन निघून जाण्यासाठी चेहऱ्याला स्क्रब केलं जातं. ज्यामूळे आपला चेहरा स्वच्छ होतो. यासाठी फेस वॉश वापरणं आवश्यक आहे. तसंच आठवड्यातून एकदा फेस स्क्रब करणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे चेहर्यावर जमा झालेले डेड सेल्स निघून जातात. शिवाय चेहऱ्याच्या त्वचेवर जमा झालेली घाणदेखील निघून जाते. काही महिला चुकीच्या पद्धतीने स्क्रब करतात आणि यामुळे चेहऱ्याला नुकसान होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्क्रब करताना काय आणि कशी काळजी घ्यावी हे सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
० स्क्रब कोणी वापरावा?
– चेहऱ्यावर स्क्रबिंग करण्याचं योग्य वय २५ आहे. यामुळे २५ पेक्षा कमी वयाच्या लोकांनी स्क्रब करू नये. वयाच्या पंचविशीनंतर चेहऱ्यावर डेड सेल्स बनायला लागतात. पंचवीस पेक्षा कमी वयाच्या लोकांची स्किन मुळातच हेल्दी असते. त्यामुळे चांगल्या त्वचेवर स्क्रबिंगचा फायदा होत नाही. तर उलट नुकसान होते.
० स्क्रब वापरताना घ्यावयाची काळजी
१) दररोज स्क्रब नको – आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्क्रब करणे योग्य आहे. मात्र दररोज स्क्रब लावू नये. तसेच २ स्क्रबिंगमध्ये जास्त गॅपही ठेवू नये. परंतु दररोज जास्त प्रमाणात स्क्रब केल्यास त्वचेचे नुकसान होते. ड्राय स्किन असलेल्यांनी आठवड्यातून एकदा आणि ऑयली स्किनवर दोनवेळा स्क्रब मसाज करणं आवश्यक आहे.
२) स्कब करण्याआधी चेहरा स्वच्छ करा – चेहऱ्यावर मेकअप असेल किंवा कोणतीही घाण चेहऱ्यावर राहिली असेल तर स्क्रब केल्यावर रोमन छिद्रांमधून घाण जाण्याऐवजी त्यामुळे आणखी त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे स्क्रब लावताना चेहऱ्यावरचा मेकअप आधी आणि यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
३) चांगला स्क्रब वापरा – आजकाल चेहऱ्याच्या त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब बाजारात उपलब्ध असतात. पण तरीही हे नेहमी लक्षात ठेवा कि आपल्या त्वचेच्या पोतानुसारच स्क्रब निवडायचा आहे.
४) चेहऱ्यावर थेट स्क्रब वापरू नका – चेहरा स्क्रब करण्यासाठी तो थेट चेहऱ्यावर वापरू नये. यामुळे चेहऱ्याची त्वचा दुखावली जाऊ शकते. म्हणून चेहरा स्क्रब करताना यामध्ये पाणी मिसळून चेहऱ्यावर वापर करा.
५) योग्य पद्धतीने मसाज – चेहऱ्यावर स्क्रबने मसाज करताना हलक्या हाताने करा. जोरात किंवा जास्त दाब देऊन स्क्रब केल्यामुळे चेहऱ्याचं नुकसान होईल. अगदी १०-२० सेकंदापेक्षा जास्त वेळ स्क्रबने चेहऱ्यावर मसाज करू नये.
६) घरगुती स्क्रब – घरगुती स्क्रब वापरत असाल तर, तो जास्त जाड वा बारीक नसेल याची काळजी घ्या. आपल्या चेहऱ्याला सूट होईल अशाच स्क्रबचा वापर करा. घरगुती स्क्रब म्हणून आपण संत्र्याची साल, पपईच्या बिया आणि साखर, तांदळाचं पीठ यांचा वापर करू शकतो.
७) टोनरचा वापर – चेहरा स्क्रब केल्यानंतर चेहऱ्यावर टोनर लावणं आवश्यक आहे. घरगुती टोनर म्हणून टोमॅटो, काकडी, पपई यांचा रस वा गर चेहऱ्यावर लावावा.