थंडीमध्ये पायात गोळे येत असतील तर ‘हे’ घरगुती उपाय जरूर करा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा थंडीच्या दिवसांमध्ये रात्री जास्त थंडी लागल्यानंतर झोपेतच पायांत गोळे येतात. हि वेदना इतकी तीव्र आणि असह्य असते कि बस्स.. थकवा, अशक्तपणा हीदेखील यामागील महत्वाची कारण असू शकतात. तसेच अतिरिक्त व्यायाम केल्यानेसुद्धा पायांमध्ये गोळे येतात. पण प्रामुख्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि शरीरात पोषक तत्वांची कमतरता असणे यामुळे पायात गोळे येण्याचा त्रास संभवतो. पायात गोळे येण्याच्या समस्येला पायात पेटके येणे वा लेग क्रॅम्स असेही म्हणतात. पायात गोळे आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखू लागतात. पायात अचानक कळ गेल्यामुळे हि स्थिती असह्य असते. आज आपण याच विषयी थोडी माहिती घेणार आहोत. सर्वात आधी पायात गोळे येण्याची कारणे आणि यानंतर घरगुती उपायांची माहिती करून घेऊ खालीलप्रमाणे:-
० पायात गोळे येण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे –
१) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे.
२) शरीरातील पोटेशियम, मॅग्निशियम, सोडिअम व कॅल्शियम हे क्षारघटक कमी जास्त होणे.
३) अतिश्रम वा व्यायाम करणे.
४) पायाच्या स्नायूंवर ताण येऊन मांसपेशी दुखावणे.
५) भरपूर घाम येणे.
६) गर्भारपण
७) मासिक पाळीचे दिवस
८) किडनीचे विकार
९) थायरॉईड, मधुमेह, पार्किन्सन्स आजार.
१०) मद्यपान, अल्कोहोल वा दारूचे व्यसन.
० पायात गोळे येण्यावर घरगुती उपाय –
१) दूध व दुधाचे पदार्थ – पायात गोळा येण्याची समस्या जाणवत असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लासभर दूध प्या. कारण दुधात कॅल्शियम आणि प्रोटिन्स भरपूर असते. त्यामुळे मांसपेशीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
२) शहाळ्याचे पाणी – शहाळ्याच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम व सोडिअम असे क्षार घटक असतात. जे नैसर्गिक इलेक्ट्रोलाईटप्रमाणे कार्य करते. त्यामुळे पायाला गोळे येण्याची समस्या दूर होते.
३) केळे – केळ्यामध्ये पोटॅशियम असते. यामुळे दररोज एक केळे जरूर खा.
४) आवळा – रोज पहाटे उपाशी पोटी २ आवळे खावे. पायात गोळे येण्यावर हा सर्वोत्तम असा रामबाण उपाय आहे.
५) कच्चा मुळा – पायात गोळे येण्याच्या त्रासावर कच्चा मुळा खा. यामुळे ही समस्या लवकर दूर होते.
६) संत्र – पायात गोळे येत असतील तर संत्र किंवा संत्र्याचा रस सेवन करावा. कारण हा पोटॅशियमचा सर्वात मोठा स्रोत आहे.
७) निर्गुडी तेल – पायात गोळा आला असल्यास पायाच्या पोटऱ्या दुखतात. यासाठी कोमट केलेले निर्गुंडीचे तेल पायाच्या पोटरीला लावा आणि थोडी मालीश करा. निर्गुंडीचे आयुर्वेदिक तेल या त्रासावर खरोखरच उपयुक्त ठरते.
८) व्यायाम – व्यायाम करताना पायांवर अति ताण देऊ नका. याउलट नेहमी पाय मोकळे करा. नियमीत पाय लांबवणे, पायाला तेलाचा मसाज देणे अश्या सवयी ठेवा.
९) इतर – शेवग्याच्या शेंगांची भाजी, उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, डिंकाचे लाडू, कोबी असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खा.