दुधात गुळ मिसळून प्या आणि शरीराची काळजी घ्या; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो. यामुळे सकाळचा नाश्ता काय असावा? कसा असावा? किती असावा? याबाबतच्या अनेक शंकाच तुमचं निरसन झालं असेल. सकाळी चहाऐवजी अनेकांनी दुधाचा पर्याय निवडणे आता योग्य मानले आहे. परंतु, नुसते दूध पिणे ज्यांना आव्स्त नाही ते दुधात साखर मिसळून पिणे पसंत करतात. अशा लोकांना आम्ही सांगू इच्छितो कि या ऐवजी दुधात गुळ मिसळून प्या. यामुळे निश्चितच शरीराला अधिक लाभ मिळेल.
दररोज सकाळी गूळ मिसळून गरम दूध प्यायल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. कारण व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी व्यतिरिक्त, कॅल्शियम, प्रथिने आणि लॅक्टिक अॅसिड दुधात समाविष्ट असते. तर गुळात सुक्रोज, ग्लुकोज, लोह आणि अनेक खनिजे आणि महत्वाचं म्हणजे नैसर्गिक साखर समाविष्ट असते. यामुळे जेव्हा हे दोन्ही एकत्र घेतलं जातं तेव्हा ते एक आरोग्यदायी पेय बनतं. त्यामुळं आपल्या शरीराच्या गरजा त्वरित पूर्ण केल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया गरम दुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-
१) रक्त शुद्धीकरण – गरम दुधात गुळ मिसळून प्यायल्यास आपले शरीर आतून निरोगी राहते. इतकेच नव्हे तर यामुळे रक्त डिटॉक्स करण्याचं काम केलं जातं.
२) पचनक्रियेत सुधार – गरम दुधात गूळ मिसळून प्यायल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. यामुळे आपली पचन प्रणाली सुरळीत होते आणि यामुळे खाल्लेलं अन्न योग्य रित्या पचते.
३) सांधेदुखीपासून आराम – आजकाल अनेक लोकांना सांधेदुखीचा त्रास असल्याचे आढळते. हा त्रास अगदी असह्य करणारा असतो. म्हणून, सांधेदुखी दूर करण्यासाठी दुधात गुल मिसळून पिणे फायदेशीर आहे. यामुळे सांधेदुखीत त्वरित आराम मिळतो.
४) लठ्ठपणा नियंत्रित करते – दुधात साखर मिसळून पिणे शरीरातील लठ्ठपणा वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. यासाठी नैसर्गिक साखर समाविष्ट असणाऱ्या गुळाचा आहारात समावेश करावा. गरम दुधात गूळ मिसळून प्यायल्यास शरीरात मेद जमा होत नाही. परिणामी वजन कमी होतं.
५) त्वचा निरोगी होते – गरम दूध आणि गुळ हे कॉम्बिनेशन फक्त शरीराच्या आरोग्यासाठी नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. कारण गुल मिसळलेले दूध प्यायल्यास त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. याच्या सेवनामुळे त्वचा मऊ आणि निरोगी राहते.
६) मासिक पाळीच्या त्रासात आराम – महिलांना मासिक पाळीदरम्यान अनेक त्रास होतात. या त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी गरम दुधात गुळ मिसळून खाणे फायदेशीर आहे. तसेच कोमट दुधात गुळ मिसळून प्यायल्याने पाळीदरम्यान क्रॅम्प येत नाहीत.