आयलाइनर लावताना हात थरथरतो? मग या टिप्स जरूर वापरा आणि परफेक्ट लाइनर लावा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोणताही सोहळा, लग्न, बारसं, इव्हेंट काहीही कार्यक्रम असो, यासाठी स्त्रिया आवर्जून मेकअप करतात. याचे कारण म्हणजे मेकअपमूळे स्त्रियांचा चेहरा आहे त्याहून अधिक खुलून दिसतो आणि लक्षवेधी वाटतो. यामुळे आपला मेकअप कसा परफेक्ट असेल याकडे स्त्रिया प्रामुख्याने लक्ष देत असतात. यात मेकअप लूक पूर्ण करण्यासाठी आयलाइनर फार आवश्यक असते. कारण लाइनरमुळे डोळे अतिशय रेखीव दिसतात. पण यासाठी आपण लावत असलेले आयलाइनर हे चांगल्या दर्जाचे आणि योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे.
डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी परफेक्ट आयलाइनर लावणे खूपच गरजेचे आहे. बर्याच स्त्रिया तर दररोज अंगदी ऑफिसला जातानासुद्धा आयलाइनर लावणे पसंत करतात. तर काही स्त्रिया ते फक्त एखाद्या कार्यक्रमादरम्यानच लावतात. अशा परिस्थितीत क्वचितच आयलाइनर लावणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील प्रमुख समस्या म्हणजे आयलाइनर लावताना हात थरथरणे. यामुळे आयलाइनर परफेक्ट लावता येत नाही आणि ते दिसताना अतिशय खराब दिसत. अशा परिस्थितीत काय करावे ते सुचत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला आयलाइनर योग्य पद्धतीने लावता यावे यासाठी काही खास अश्या ब्युटी टिप्स आणि युक्त्या सांगणार आहोत.
बरं का मैत्रिणींनो, या आयडिया फक्त तुमच्यासाठी हा! इतर कुणाला सांगू नका. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) परफेक्ट लाइनर लावण्यासाठी, फार ब्रॉड किंवा डार्क लावण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवातील लहान रेखून मग त्याला आकार द्या.
२) आय लाइनर लावताना हात थरथरत असेल तर आपण कोपराला कशाचा तरी आधार द्या. असे केल्याने हात हलणार नाही आणि आपले आय लाइनर सरळ लागेल.
३) लाइनर लावताना हात थरथरत असतील तर आपण अगदी पेन्सिल आय लाइनरचादेखील पर्याय निवडू शकता. कारण लिक्विड लाइनर लावणे थोडे अवघड असते. असे लाइनर लावताना चुकले तर ते लवकर पसरते. या स्थितीत, आपण पेन लाइनर वापरालं तर ते सोप्पे जाईल.
४) बर्याच लोकांना लहान हँडलच्या ब्रशने लाइनर लावणे कठीण जाते. त्यामूळे जर तुम्हालाही लाइनर लावताना अडचण येत असेल तर लांब हँडलचे लाइनर वापरणे सोपे आहे. कारण आपण हे सहजपणे हातात पकडू शकता.
५) व्यवस्थित आयलाइनर लावण्यासाठी टेपचा वापर करता येईल. यासाठी आपण टेपचा थोडासा भाग कापून डोळ्यांखाली तिरका लावा आणि लाइनर रेखल्यावर टेप काढा. या युक्तीच्या साहाय्याने आपण आयलायनर सहजपणे आणि अगदी कोरीव लावू शकता.