हिवाळ्यात या टिप्स वापरालं तर चेहरा काळवंडणार नाही; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। दरवर्षी हिवाळा आला कि सगळ्यात जास्त काळजी वाटते ती आपल्या त्वचेची. कारण हिवाळ्याच्या दिवसात त्वचा कोरडी पडते, डिहायड्रेट होते आणि परिणामी आपली त्वचा अगदी रुक्ष, कठोर व निर्जीव दिसू लागते. पण तरीसुद्धा अनेक लोक असे आहेत जे त्वचेची काळजी व्यवस्थित घेत नाहीत. उदाहरणार्थ, बरेच लोक सनस्क्रीन न लावता बराच वेळ उन्हात बसतात. यामुळे काय होतं? असा सवाल या लोकांकडून येतो. तर मित्रांनो, असे केल्यामुळे त्वचा टॅन होते आणि इतकेच नाही तर यामुळे शरीराचे निर्जलीकरण अर्थात डिहायड्रेशन देखील होते. परिणामी त्वचा खराब होते. हिवाळ्यात आधीच तापमान थंड असल्यामुळे त्वचेतील आद्रता कमी होत असते. यामुळे हिवाळ्यात प्रामुख्याने त्वचेची काळजी न घेतल्यास आपली त्वचा काळी, निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही साध्या, सोप्प्या आणि सरळ ब्युटी टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकाल. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) भरपूर पाणी प्या आणि त्वचा हायड्रेट ठेवा.
– हिवाळ्यात आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. जास्त पाणी प्यायल्याने त्वचा आतून स्वच्छ राहते. यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात. म्हणून हिवाळ्यातच नव्हे तर कोणताही ऋतू असू द्या दररोज ८-१० ग्लास पाणी प्या.
२) सनबाथ घेताना सनस्क्रीन लावायला विसरू नका.
– सनबाथ आपल्या त्वचेसाठी आरोग्यदायी असला तरीही सूर्याच्या थेट किरणांपासून दूर राहा. थंड वातावरणातही सूर्याची UV किरणे सक्रिय राहतात. यामुळे जास्त वेळ उन्हात बसल्याने त्वचा टॅन होऊन त्याची चमक कमी होते आणि त्वचा काळी पडते. त्यामुळे हिवाळ्यातही उन्हात बसण्यापूर्वी सनस्क्रीन लावा आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
३) त्वचेला मॉइश्चरायझ्ड ठेवा.
– दिवसातून किमान दोनदा चेहरा धुवा आणि चेहऱ्याला मॉइश्चरायजर लावा. पण लक्षात ठेवा आपल्या त्वचेचा पोत लक्षात घेऊन त्वचेला मॉइस्चराइज करा. चेहरा मॉइश्चरायझ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी चांगल्या हर्बलचाच वापर करा. यासाठी पुन्हा-पुन्हा फेसवॉश लावण्यापेक्षा साध्या पाण्याने चेहरा धुतला तरीही चालेल.
४) त्वचेसाठी क्लिनींग, टोनींग आणि मॉईश्चयजिंग गरजेचे आहे.
– क्लीनिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग म्हणजेच CTM दिवसातून एकदा तरी करा. यात त्वचा स्वच्छ करण्यासाठी दूध वापरले जाऊ शकते. आपल्या त्वचेच्या टोननुसार टोनिंगची निवड करा आणि त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल वापरा.
५) बाहेर फिरताना स्कार्फ किंवा फेसमास्कचा वापर करा.
– हिवाळ्याच्या दिवसात त्वचा लवकर कोरडी होते. यामुळे वातावरणातील धूळ, माती आणि प्रदूषण अगदी सहज त्वचेचे नुकसान करतात. यासाठी बाहेर फिरताना स्कार्फ वा फेसमास्कचा वापर करा.