वाढत्या वयाबरोबर होणारे विस्मरण टाळायचे असेल तर या टिप्स जरूर वापरा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। जसजसे वय वाढत जाते तस तशा काही ना काही शारीरिक समस्या उद्भवतात. कित्येक आजार पाठीच लागतात. यात मधुमेह, उच्च रक्तदाब, गुडघेदुखी, संधिवात क्वचित कधी किडनी संबंधीत आजार, डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू असे आजार ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून येतात. वयोमानानुसार हे आजार होतात. त्याचबरोबर सुरुवातीपासूनच पथ्य पाळणे, योग्य औषधे घेणे, वजन आटोक्यात ठेवणे असे उपाय केले तर यांवर मात करणेदेखील शक्य होते. परंतु या बरोबर आणखी एक आजार बहुतेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून येतो आणि तो म्हणजे विस्मरण. हल्ली अगदी पन्नाशीपासूनच विस्मरण होऊ लागते. जसे कि, एखाद्या चित्रपटाचे, नटाचे नाव न आठवणे वा काल परवा भेट दिलेल्या रेस्टॉरंटचे नाव विसरणे. अचानक भेटलेल्या जुन्या मित्र, मैत्रिणीचे नाव व आठवणे. याशिवाय घरचा पत्ता व जवळच्या व्यक्तीचा मोबाइल नंबर आठवेनासा होणे.
अशा प्रकारचे विस्मरण गंभीर नसेल तरीही दुर्लक्ष करण्याइतके साधारण नाही. निश्चितच यात व्यक्तीचा स्वतःवर संपूर्ण ताबा असतो. दररोजच्या दैनंदिन कामांमध्ये त्या व्यक्तीस कोणताही अडथळा येत नाही. पण ज्याप्रमाणे आपण वाढत्या वयाबरोबर होणारे इतर शारीरिक आजार गृहीत धरून आधीपासून उपाय करायला सुरुवात करते. तसेच असे विस्मरण आधीच गृहीत धरून त्याप्रमाणे आपण वागणे आवश्यक असते.
० वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होऊ नये यासाठी टिप्स:-
१) वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्ती कमी होऊ नये म्हणून तरुणांनी आणि प्रौढांनी मेंदूची कार्यक्षमता वाढून गोष्टी लक्षात ठेवण्याची त्याची तत्परता वाढेल अश्या कार्यांना गती द्यावी. यामुळे वाढते आणि विस्मरण होणे कमी होते वा पुढे ढकलले जाते.
२) यासाठी तरुणांनी, प्रौढांनी शब्दकोडी सोडवणे, सुडोकूसारखे मेंदूला व्यायाम देणारे कोडे सोडवणे, उत्तम पुस्तकांचे वाचन करणे, वेगळे शब्द वहीत लिहून ठेवण्याची सवय लावून घेणे, गणिती आकडेमोड स्वतः करणे असे उपाय करावे.
३) घरामध्ये असताना फोनमध्ये व्यस्त राहण्यापेक्षा कुटुंबियांनी एकमेकांशी बोलणे, संवाद साधणे अश्या गोष्टींची सातत्यता ठेवा. तसेच फोनमध्ये सेव्ह केलेले नंबर वापरण्यापेक्षा नंबर डायल करण्याची सवय ठेवा.
४) स्मरणशक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेणे टाळा. असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
५) विस्मरण आजाराची गंभीर पातळी म्हणजे डिमेनशिया किंवा अल्झायमर. हे आजार मात्र गंभीर असू शकतात. त्यावर मेंदूविकार तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ डॉक्टरांची मदत आणि उपचार घेणे अत्यावश्यक आहे.