मधुमेहावर कंट्रोल करायचं असेल तर आहारात रताळ्याचा समावेश करा; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन| हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला आतून आणि बाहेरून दोन्हीकडून संरक्षणाची गरज असते. कारण या दिवसात आपले शरीर बऱ्याच बदलातून जात असते. या बदलत्या वातावरणाचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो मधुमेहींवर. विशेष म्हणजे भुकेवरील नियंत्रण बिघडते आणि यामुळे मधुमेहींना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. अशावेळी मधुमेहींनी रताळे खाणे फायदेशीर आहे. कारण रताळ्यामध्ये खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. चला तर जाणून घेऊयात रताळे खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे :-
मधुमेहींसाठी फायदेशीर – रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. शिवाय यातील घटक रक्तातली साखर वाढू देत नाही. शिवाय रताळ्यातील अँटि ऑक्सिडंट्समुळे, रक्तात वाढलेली साखर लवकर शोषण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेही बिनधास्त रताळे खाऊ शकतात.
रक्तदाबावर नियंत्रण – रताळ्यामध्ये पोटॅशियम देखील असते, त्यामुळे ते उच्च रक्तदाबापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. शंकरकंद खाल्ल्याने हृदयाचे आजार बरे होतात. रताळ्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
पचनक्रियेस लाभदायक – रताळ्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. या फायबरमुळे रताळ खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते.
बद्धकोष्ठता दूर होते – रताळे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यातील फायबर बद्धकोष्टतेवर परिणामकारक आहे. अगदी कोणत्याही प्रकारचा पोटदुखीचा त्रास होत असेल तर रताळे खाणे फायदेशीर आहे.
दृष्टी सुधार – रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए खूप जास्त असते. मुळात रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते. याचे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी रताळे खाणे फायदेशीर आहे. यामुळे दृष्टी चांगली राहते.
रोगप्रतिकारक शक्तीत वाढ – रताळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर असते. यामुळे संसर्गजन्य रोगांपासून बचाव करणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
रक्ताची कमतरता दूर होते – रताळ्यामध्ये भरपूर लोह असते. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते शिवाय शरीरी ऊर्जा टिकून राहते. तसेच रताळे खाण्यामुळे रक्तपेशीही योग्य प्रकारे कार्यरत राहतात.