(अ) घोळाणा फुटणे म्हणजे काय?; जाणून घ्या कारणे आणि लक्षणे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या ऋतुचक्रानुसार हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे. हिवाळ्याच्या मध्यान्हामध्ये थंडीची तीव्रता अधिक असते. यामुळे अनेकांना सर्दी होते. या सर्दीमध्ये नाक ओढताना वा वारंवार पुसताना, तसेच शिंकरताना नाकामधील छोटया रक्तवाहिन्या दुखावल्या जातात. दरम्यान सर्दी जास्त असेल आणि ती नाकावाटे बाहेर येत नसेल तर जबरदस्ती शिंकरताना नाकातील रक्तवाहिन्या फुटल्यास नाकातून रक्त येते. कधीकधी नाकाला एखादा धक्का वा हिसका बसल्यास देखील नाकातून रक्त येते. नाक गळण्याच्या या प्रकाराला सामान्य भाषेत ‘घोळाणा फुटणे’ असे म्हणतात. आज आपण जाणून घेणार आहोत कि घोळाणा फुटणे हि क्रिया नक्की कोणत्या कारणामुळे होते. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
० घोळाणा फुटण्याची कारणे
२) अती मद्यपान – मद्यपान करणा-या लोकांना आपण किती मद्य पितोय याची कल्पना नसते. अशावेळी नाकातून रक्त येण्याचा धोका संभवतो. तज्ञांच्या मते, अती मद्यपानामुळे रक्तप्रवाह प्रवाहीत करताना रक्तवाहिन्यांवर विशिष्ठ दाब येतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जखम निर्माण होते. परिणामी नाकातून रक्त येते.
३) इनफेक्शन – एखादी एलर्जी, सर्दी, घशामध्ये दाह, घशामध्ये सूज वा श्वसनाचे इनफेक्शन या सर्व कारणांमुळे नाकातून रक्त येण्याची शक्यता असते. कारण यांपैकी कोणत्याही स्थितीत नाक, कान आणि घशामध्ये सूज येते. नाक, घसा व कानाच्या अंतर्गत भागात यांमुळे अडथळा निर्माण होतो आणि नाकातून रक्त येऊ लागते.
४) बदलते हवामान – अनेकदा हवामानातील अचानक बदल घोळाणा फुटण्याचे कारण असू शकते. कारण कोरड्या हवेमुळे नाक कोरडे होते तर उष्ण हवामानामुळे नाकात गरमी तयार होते. याशिवाय हवेत आद्रता असेल तर नाकात जास्तीचा ओलावा धरतो. या प्रत्येक स्थितीमध्ये नाकाच्या अंतर्गत भागातील नसांवर विविध परिणाम होत असतो. वातावरणातील बदल अथवा घरातील वातानूकुलीत उपकरणे यामुळे हवा सतत बदलते आणि यामुळे नाकातून रक्त येऊ लागते.
एसीचा अति वापर – काही लोकांना एअर कंडिशनशिवाय झोपसुद्धा लागत नाही. अशा लोकांचा जास्तीत जास्त वेळ एसीमध्ये जातो. याशिवाय आजकाल अनेक ऑफिसेसमध्ये एसी असतोच. यामुळे तेथे काम करणाऱ्या व्यक्तीस एसीमध्ये बराचवेळ घालवावा लागतो. यामुळे नाकामधील टीश्यूज कोरड्या व कडक होतात. हे टिश्यूज कडक झाल्यामुळे जेव्हा नाक ओढले वा खरडवले जाते तेव्हा त्यातून आपसूकच रक्त येऊ लागते.
० घोळाणा फुटण्याची लक्षणे – हा विकार अतिशय दुर्मिळ विकार असून फक्त ७ ते १९ वयोवर्षाच्या मुलांमध्ये आढळतो. याची काही विशिष्ट लक्षणे आहेत. जसे कि,
१) नाकाच्या व घश्याच्या वरच्या भागात कँसर नसलेली गाठ येणे. ही गाठ वाढून श्वसनमार्ग बंद झाल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.
२) नाकातून वारंवार रक्त येणे.
३) श्वास घेण्यास त्रास होतो.
४) नाकपुड्यांतून रक्तासारखा चिकट पदार्थ वाहणे.
५) नाकात वेदना जाणवणे.
६) कमी ऐकू येणे.