स्वतःच्या लग्नात फिट दिसायचं असेल तर फॅट करणाऱ्या ‘या’ गोष्टी टाळा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता नोव्हेंबर – डिसेंबर म्हटलं म्हणजे सगळ्यांच्याच घरात किमान एक लग्न तरी असतेच नाही का? जणू उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यासारखा या नोव्हेंबर डिसेंबर दोन महिन्यांमध्ये लग्नसराई नावाचा एखादा ऋतूच सुरू असतो. कारण बहुतेक लग्न या दोन महिन्यांमध्ये मोठ्या धुमधडाक्यात होतात. काय ओ? तुमच्याही घरात कुणाचं लग्न आहे का? काय सांगता तुमचं स्वतःच? मग तयारी एकदम जोरात असेल ना? आणि डाएट ते हि जोरावरच सुरु असेल. जर या सीझनमध्ये खरंच तुमचं लग्न असेल तर ताबडतोब तुमच्या डाएट मध्ये सुरु असणार चीटिंग थांबवा आणि काही वस्तू खाणं लगेच बंद करा.
नाहीतर लग्नानंतर फोटो पाहताना फोटोग्राफरला नाव ठेवत म्हणाल कि याने मुद्दाम मी जाड दिसेन असा फोटो काढला आहे. नाहीतर त्याच्या कॅमेऱ्यात कायतरी फॉल्ट असेल. एक खरं सांगू का? त्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात नाही तुमच्या डाएटमध्ये फॉल्ट असल्यामुळे ते फोटो नंतर नकोसे वाटतात. तुम्ही कितीही नाही म्हणालात तरीही हेच खरं आहे. कारण, हिवाळ्यात काही पदार्थ खाल्ल्याने वजन वेगाने वाढवते आणि शरीरावर फॅट जमू लागते. परिणामी तुम्ही दुसरं कुणाचं सोडाच स्वतःच्या लग्नात फिटऐवजी फॅट दिसत.
आता हे पदार्थ कोणते ते जाणून घ्यायचे असतील तर हा लेख पूर्ण वाचा. खालीलप्रमाणे:-
१) चहा वा कॉफी – थंडीच्या दिवसात बहुतेक सगळेच आवडीने गरमागरम चहा किंवा कॉफीचे सेवन करतात. परंतु यामुळे अतिशय वेगाने वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच दूधाच्या चहाऐवजी थंडीच्या दिवसात हर्बल टी पिण्यास प्राधान्य द्या.
२) पराठे – हिवाळ्यामध्ये तूपासोबत बटाटा, मुळा, मेथी इत्यादीचे पराठे खाण्याची इच्छा होणे फार साहजिक आहे. पण जिभेवर तभा ठेवा आणि हे पदार्थ खाणे टाळा. कारण असे पराठे खाल्ल्यामुळे शरीरातील मेद वाढू शकते. परिणामी वजन वाढते आणि चरबीचे प्रमाण वाढू लागते.
३) गाजरचा हलवा – हिवाळ्यात गाजर जास्त उपलब्ध असतात. यामुळे अश्या दिवसात गाजरचा हलवा बेस्ट फूड मानला जातो. त्यात हलवा करताना गावठी तूप असेल तर आणखीच मजा येते. परंतु साखर आणि तूप यांच्या सेवनामुळे वजनावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते.
४) क्रिमी सूप – हिवाळ्यात क्रिमी असं गरमागरम सूप प्यायला अनेकांना आवडतं. त्यामुळे तुम्हीही जर क्रिमी सूप पिण्याचा विचार करत असाल तर हा विचार आताच मनातून काढून टाका. कारण, क्रीम सूपमध्ये कॅलरीची मात्रा भरपूर असते. परिणामी वजन झपाट्याने वाढते.
५) आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स – आईस्क्रीम आणि कोल्डड्रिंक्समध्ये असे अनेक घटक समाविष्ट असतात जे ह्या पदार्थांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सहाय्यक असतात. मात्र हेच घटक आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतात. त्यामुळे आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स समोर असतील तर डोळे मिटा पण खाऊ वा पिऊ नका.