अर्धपारदर्शी भीमसेन कापूर अनेक रोगांवर प्रभावी; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। भीमसेन कापूर हा अर्धपारदर्शी असा कापराचा प्रकार आहे. हा कापूर अतिशय दहनशील अर्धवट पांढरा असतो. त्याला एक विशिष्ट असा तीव्र वास आणि हलकीशी आंबट चव असते. या कापराचा वापर बहुतांशी मंदिरात वा घरी आरती, धुपारती यांमध्ये केला जातो. भीमसेन कापराचे वैज्ञानिक नाव सीनॅमोमम कॅम्फर असे आहे. माहितीनुसार केवळ ५० वर्ष जुनी झाडेच कापराचे तेल बनवण्यासाठी पात्र भूमिका निभावतात. मित्रांनो सर्दी खोकला वा कफ झाल्यास आपण जे वॅपोरब छातीला आणि नाकाला लावतो त्यामध्ये भीमसेन कापराचा वापर केलेला असतो. भीमसेन कापूर अत्यंत कार्यशील आणि स्वतःच एक औषधी असल्यामुळे विविध आजारांमध्ये सहाय्यक आहे. चला तर जाणून घेऊयात भीमसेन कापूरचे फायदे खालीलप्रमाणे:-
१) सर्दी आणि खोकला – सर्दी आणि खोकला हे अतिशय सर्वसामान्य असे संसर्गजन्य आजार आहेत. यावर भीमसेन कापूर प्रभावी काम करतो. शिवाय घशातील रक्त संचय यासाठी देखील भीमसेन कापूर फायदेशीर आहे. यासाठी आपल्या छातीवर आणि पाठीवर मध्यभागी भीमसेन कापूरचे तेल काही प्रमाणात मसाज करा. असे केल्यास अगदी तासाभरात सर्दी खोकला पळून जाईल.
२) स्नायूंसाठी लाभदायक – भीमसेन कापूर मिसळली उत्पादने स्नायूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अगदी पेटके, उबळ आणि ताठरता ह्या समस्यांमध्ये भीमसेन कपूर सहाय्यक आहे. या कापूरमध्ये अँटिस्पास्मोडिक आणि आराम देणारे गुणधर्म असतात.
३) दम्यावर प्रभावी – भीमसेन कापूरची वाफ श्वसननलिका स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहे. असे केल्यास दम्यातील रोग्यांसाठी फायदा होतो. कापूरच्या तीव्र सुगंधासह सतत इनहेलेशन केल्याने श्वसनविषयक त्रास व रोग कमी होतात. परिणामी दमा कमी होतो.
४) एक्झामामध्ये फायदेशीर – एक्झामा हा एक त्वचेची जळजळ करणारा रोग आहे. या रोगावर भीमसेन कापूर प्रभावी आहे. भीमसेन कापूर अनेक लोशन आणि एक्जिमाच्या मलममध्ये आढळतो. कारण भीमसेन कापूर जळजळ विरोधी व दाहकविरोधी आहे. यामुळे संबंधित आजारातून मुक्त होण्यासाठी फायदा होतो.
५) नखांचा इन्फेक्शनपासून बचाव – ऑन्कोमायकोसिस हा एक नखांचा रोग आहे. या रोगात नखांवर फंगल इन्फेक्शन होते. परिणामी नखांमध्ये बुरशी होते. यासाठी भीमसेन कापूर असलेली औषधे वापरणे फायदेशीर आहे. कारण भीमसेन कापूर ट्रायकोफिटन मेन्टाग्रोफाइट्स आणि कॅन्डिडा पॅरासिलोसिसमुळे होणार्या ऑन्कोमायकोसिस विरूद्ध प्रभावी आहे. म्हणून ऑन्कोमायकोसिस झाल्यास भीमसेन कापूर पाण्यात विरघळवून बाधित भागावर काही दिवस लावा. यामुळे नक्कीच आराम मिळेल.
६) शारीरिक वेदना आणि सूज दूर – भीमसेन कापूरमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात. हे शारीरिक वेदना आणि सूज दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. यात भीमसेन कापूर शरीरातील मांसपेशींना सुन्न करते आणि यामुळे शरीरातील वेदना व सूज दूर होते.
७) निद्रानाशापासून सुटका – भीमसेन कापराच्या मादक व तीव्र सुगंधामुळे मनावर शांत प्रभाव पडतो. परिणामी रात्री चांगली गाढ झोप येते. त्यामुळे रोज भीमसेन कापूरचे तेल थोडेसे उशीला वा चादरीला चोळा. जेणेकरून तुम्हाला रात्री चांगली झोप येईल.
८) त्वचेवरील पुरळपासून मुक्तता – त्वचेवर मुरूम, चट्टे वा लाल पुरळ येत असतील तर भीमसेन कापूर असलेले क्रिम वा बाम चेहऱ्यावर लावा. यामुळे पुरळ आणि लालसरपणापासून मुक्त होण्यास मदद करते.
९) घनदाट केस – डोक्यावर केस गळणे वा कमी होणे दोन्ही सारखंच. कारण दोन्हीमध्ये टक्कल पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे टक्कल नको असेल तर केमिकलने भरलेल्या उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा भीमसेन कापूर विकत घ्या आणि घनदाट केस मिळवा. यासाठी रोज वापरातील तेल गरम करून त्यात भीमसेन कापूर विरघळून घ्या आणि थंड करून डोक्याला मसाज करा. यामुळे डोक्यातील क्षेत्रामध्ये रक्त प्रवाह उत्तेजित होतो आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
१०) भाजलेल्या त्वचेवर लाभदायी – भीमसेन कापूरचे बाम वा क्रीम भाजलेल्या त्वचेवर लावल्यास जखमा बऱ्या होण्यासाठी मदत होते.