|

वर्किंग वूमेन्ससाठी वेळ आणि कष्ट वाचविणाऱ्या सुपर किचन टिप्स; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल क्षेत्र कोणतही असुद्या पुरुषांसोबत महिला खांद्याला खांदा लावून जबाबदारीने आपली कामे पार पाडताना दिसून येतात. यात महिला एकावेळी अनेक काम करताना दिसतात. जसे कि, घरातली सर्व कामे, यासह मुलांचा अभ्यास घेणं, मोठ्यांची काळजी घेणं, ऑफिसमधील काम योग्यरितीने करणं. आपल्या कामात नेहमीच दर्जा देणं आणि अजून बरच काही. अशावेळी या महिलांची पूर्ती तारांबळ होते आणि अनेकदा या स्वतःच्या आरोग्याकडे लक्षच द्यायला विसरतात. याशिवाय आपले छंद आणि आवड जोपासायला विसरतात. म्हणूनच अश्या सुपर वर्किंग वूमेन्ससाठी आम्ही काही खास किचन टिप्स घेऊन आलो आहोत. ज्या तुमचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचवत. चला तर फार फाफत पसारा न करता थेट टिप्सकडे वळूया आणि बोरिंग लाईफ थोडी इंटरेस्टिंग बनवूया. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) उद्याचे पदार्थ आजच ठरवा
– मैत्रिणींनो सगळ्यात सोप्पी टीप म्हणजे उद्या काय बनवायचं हे सकाळी उठून ठरवण्यापेक्षा आधीच विकेंड प्लॅन करून ठेवा किंवा गडबड गोंधळ झालाच तर आदल्या रात्री ठरवा. मग विकेंड प्लॅन असेल तर त्यानुसार सामानाची लिस्ट ऑफिसमधून येताना किराणा आणि आवश्यक सामान घेऊन या. आदल्या रात्री ठरलं तर घरात काय उपलब्ध आहे त्यानुसार बनवा. यामुळे सकाळचा वाया जाणारा वेळ कुठेतरी सेव्ह होईल.

२) असं कापू का तसं सोलू
– आता सकाळी नाश्ता, जेवण, डब्बा एवढं करायचं असेल तर अशा गडबडीत कोणत्याही भाज्या कापण्यात वा सोलण्यात वेळ कशाला घालवता? आठवड्यातली एक हक्काची सुट्टी असेल तेव्हाच अशा भाज्यांचा निकाल लावून ठेवा. जसे कि मटार असतील तर ते सोलून एअरटाईट डब्यात घालून ठेवा. कोंथिबीर, पुदीना, पालेभाज्या मोकळा वेळ असताना निवडून फ्रिजमध्ये ठेवा. याशिवाय आदल्या रात्री सकाळी हवी असलेली भाजी कापून भांड्यामध्ये मोकळी ठेवा आणि सकाळी वापर करा.

३) रोजच्या पोळ्या
– कणीक मळणं हे काम अनेकदा कंटाळवाणे आणि वेळखाऊ वाटते. त्यात गडबडीत कणिक मळा आणि पोळ्या लाटा म्हणजे यातच तासभर मोडतो. यासाठी एकतर सकाळी उठून कणीक भिजवण्यापेक्षा रात्रीच जास्त कणीक भिजवून सकाळी त्याच्या पोळ्या बनवा किंवा रात्रीच जादा पोळ्या बनवून ठेवा. फक्त एक लक्षात ठेवा फ्रिजमधील कणिक सकाळी वापरण्याआधी तासभर बाहेर काढून ठेवा आणि मगच वापरा नाहीतर पोळ्या कडक होतील. शिवाय रात्रीच पोळ्या बनवला तर त्या सुटी कापडात गुंडाळून हवाबंद डब्ब्यात ठेवून द्या.

४) गोल्डन फ्राय कांदा
– आपल्या आहारात कांद्याचा सर्रास वापर होतो. त्यामुळे कांदा हवाच. पण तो परतून सोनेरी होईपर्यंत बराचवेळ जातो. म्हणून आधीच कांदा परतून वा भाजून एअरटाईट डब्यात फ्रिजरमध्ये स्टोर करून ठेवा. यामुळे तुमचा वेळ वाचतो.

५) प्युरी आणि सॉस
– आपल्या आहारात कांदा, आलं-लसूण, टोमॅटो हे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जातात. अनेकदा रस्सा भाजीसाठी या पदार्थांची एकत्र प्युरी बनवावी लागते. पण प्रत्येकवेळी प्युरी बनवायला वेळ मिळत नाही. म्हणून रिकाम्या वेळात वा सुट्टीच्या दिवशी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण यांची प्युरी बनवून फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवा आणि गरज लागेल तशी वापरा.

६) भिजवलेलं कडधान्य
– आजकाल बाजारात भिजवलेली कडधान्य सहज उपलब्ध होते. पण घरच्याघरी कडधान्य भिजवणं अगदीच २ मिनिटाचं काम आहे. शिवाय तुम्ही आवडीप्रमाणे आवडीने मूग, छोले, चणे, मटकी इ. कढधान्य मोड आणून फ्रिजरमध्ये स्टोर करू शकता. यामुळे कमी वेळ असेल आणि फार भूक असेल तर कडधान्याचे हेल्दी स्नॅक्स बनवून खा.

७) अय्यो साऊथ इंडियन डिश
– घरच्यांना साऊथ इंडियन पदार्थांची आवड असेल तर दररोज त्याचे पीठ तयार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ईडली डोस्याचं पीठ बनवून ठेऊन द्या. याशिवाय बाजारात इन्स्टंट पीठ मिळतं ते आणून हे पदार्थ बनवा. यामुळे सकाळी नाश्त्यासाठी वा टीफीनमध्ये चेंज म्हणून असे हेल्दी आणि साऊथ तडका असलेले पदार्थ खाता येतील.

८) व्हाईट ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड
– घरी झटपट काही बनवायचं असेल तर ब्रेड हा उत्तम पर्याय आहे. अगदी कमी वेळेत सँडविच, ब्रेड ऑम्लेट वा फ्रेंच टोस्ट बनवून झटपट स्नॅक्स वा ब्रेकफूड बनवता येतात.

९) चटपटीत चटण्या आणि लोणची
– जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणी आणि लोणची असतील तर क्या बात है! आगळी तुमच्या आणि मुलांच्या टीफीनमध्ये कधी पराठ्यासोबत लोणचं वा चटणी तसेच जॅम हे चांगले पर्याय आहेत. असे पदार्थ बनवून तुम्ही नक्कीच स्टोर करू शकता.

१०) नॉनव्हेजचा मसाला
– आता संडे म्हटलं का नॉनव्हेज होणार हे नक्की. पण नॉनव्हेज बनवायला वेळ लागतो. हा वेळ वाचवायचा असेल तर प्री प्लॅनिंग करा. यासाठी फ्रिजमध्ये अंडी, मासे आणि काही प्रमाणात मीट स्टोर करा. तसेच यासाठी लागणारे मसाले बनवून फ्रिजमध्ये ठेवून द्या. शिवाय शक्य असल्यास हे पदार्थ मॅरीनेट करून ठेवा. फक्त यातील कोणताही पदार्थ २-३ दिवसांपेक्षा जास्त काळ वापरू नका.