| |

(अ) ‘पॅनीक अटॅक’ कसा ओळखालं?; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि, एखाद्या गोष्टीची फार भीती वाटत असते आणि तीच गोष्ट करायची वेळ येते. मग काय? अगदी पाय लटपटू लागतात. पोटात गोळा येतो. डोकं जड होतं आणि कुठेतरी पळून जावं वाटतं. जेव्हा पॅनिक अटॅक येतो तेव्हा त्या व्यक्तीला विचित्र शारीरिक आणि मानसिक लक्षणांना सामोरं जावं लागतं. अनेकदा अशा व्यक्तीच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना वेळी काय करावं ते कळतही नाही आणि सुचतही नाही. बहुतेकवेळा समोरच्या व्यक्तीला पॅनिक अटॅक आला आहे हेसुद्धा काळात नाही. म्हणून आज आपण (अ) भागात पॅनिक अटॅकची लक्षणे आणि कारणे जाणून घेणार आहोत. यानंतर आपण (आ) भागात उपचार जाणून घेऊ.

० पॅनीक अटॅकची लक्षणे:-

०१) पोटात गोळा येणे, दुखणे.

०२) पॅनीक अटॅक आल्यास मळमळ होणे.

०३) शरीर सुन्न होणे.

०४) हातापायाला मुंग्या येणे.

०५) मरणाची भीती वाटणे.

०६) तीव्र चक्कर येणे.

०७) शरीर थरथरणे.

०८) खूप घाम येणे.

०९) श्वास घेण्यास त्रास होणे.

१०) अचानक शरिराच्या तापमानात बदल होणे.

११) छातीत वेदना होणे.

१२) हृदयाचे ठोके जलद होणे.

 

० पॅनीक अटॅकची कारणे :- मित्रांनो, पॅनीक अटॅकमागे काही सामान्य तर काही गंभीर कारणे असू शकतात. जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

०१) ताण तणावाची चिंता

०२) एखाद्या गोष्टीचा धाक वा भीती

०३) प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोल वा ड्रग्सचे सेवन करण्याची सवय

०४) अतिशय प्रमाणात कॅफिनचे सेवन (कॉफी)

०५) काही तीव्र औषधे

०६) भूतकाळातील क्लेशकारक घटना

०७) शरीरातील रासायनिक असंतुलन

०८) मानसिक अस्थैर्य

०९) अनुवांशिक त्रास

१०) एकटेपणा
– वरील सर्व बाबी पॅनिक अटॅकची मुख्य आणि गंभीर कारणे आहेत. त्यामुळे अश्या परिस्थितीवर वेळीच मात करणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर स्वरूपाच्या मानसिक वा शारीरिक आजारांची शक्यता असते.