रव्याचा स्क्रब करी निस्तेज त्वचा तेजोमय; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन।आपली त्वचा सुंदर, तजेलदार आणि नैसर्गिकरित्या तेजस्वी दिसण्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करीत असतो. न जाणे कित्येक महागडे क्रिम्स, पावडर्स, लोशन आणि अजून काय काय आपण वापरतो. पण मुळात आपली त्वचा खराब होण्यामागे असलेली प्रमुख कारणे म्हणजे, तीव्र उष्णता आणि घाम. यामुळेच आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. शिवाय यामुळे ब्लॅकहेड्स, टॅनिंग, मुरुम आणि पिग्मेंटेशन यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
उन्हाळ्या आणि हिवाळा या दोन्ही हंगामात त्वचेला जास्तच त्रास सहन करावा. उन्हाळ्यात तीव्र उष्णता आणि घामामुळे त्वचा निस्तेज होते तर हिवाळ्यात अति थंडीमुळे त्वचेवर भेगा पडतात. शिवाय या काळात ब्लॅकहेड्स, टॅनिंग, मुरुम आणि पिग्मेंटेशन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्येपासून सुटका करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करु शकता आणि असाच एक घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय आहे रव्याचा स्क्रब. होय. रव्यापासून स्क्रब तयार करता येतो. ज्याचा त्वचेच्या आरोग्याला खूप फायदा होतो. चला तर जाणून घेऊयात रव्यापासून स्क्रब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि फायदे.
० रव्याच्या फेस स्क्रबसाठी साहित्य –
– रवा ४ चमचे
– दही ३ चमचे
– मूगडाळीची पेस्ट १ चमचा
– गुलाब जल १ चमचा
० कृती – यासाठी सर्वात आधी एका वाटीमध्ये रवा आणि दही मिसळून घ्या. यानंतर हे मिश्रण ५ मिनिटं असेच ठेवून द्या. यानंतर या मिश्रणात मूग डाळीची पेस्ट आणि गुलाब जल व्यवस्थित मिसळून घ्या. झाला तुमचा रव्याचा फेस स्क्रब तयार.
० या फेस स्क्रबचा वापर कसा कराल?
– हा फेस स्क्रब चेहऱ्याला लावण्यापूर्वी आधी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. यानंतर चेहऱ्यावर स्क्रब लावा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर व्यवस्थित स्क्रब करा. पुढे १५ मिनिट आपल्या चेहऱ्यावर हा स्क्रब तसाच लावून ठेवा आणि यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
० फायदे
१) रव्याच्या फेस स्क्रबचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील धूळ आणि माती निघून जाते आणि चेहरा स्वच्छ होतो.
२) यामुळे चेहऱ्यावर आणि मानेवर साचणारा मळ सहज निघतो.
३) या फेस स्क्रबमूळे चेहरा नैसर्गिकरित्या स्वच्छ होतो. यामुळे चेहरा तेजस्वी होतो.
४) यामुळे चेहऱ्यावर येणारे मुरूम, पुरळ आणि डाग निघून जातात.
५) चेहऱ्यावरील त्वचेचे पापुद्रे निघत नाहीत.