About joint pain in older people ....
|

जास्त वय असणाऱ्या लोकांच्या सांधेदुखीच्या आजाराबध्दल ….

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक आपण पाहू शकतो , कि त्यांचे वय जास्त झाले असेल तर त्यांना सांधेदुखीच्या आजाराला समोरे जावे लागत आहे. अनेकांना गुडघ्याचे आजार निर्माण झालेले पहिले असतील . पण त्यामुळे चालण्याच्या समस्या या खूप जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतात. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपाय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ….

सांधेदुखी व त्यावरील घरगुती उपाय—-

अनेक वेळा ज्यावेळी आपण चालायला सुरुवात करू त्यावेलु सुद्धा अश्या समस्या या निर्माण होऊ शकतात. चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. त्यावेळी घरगुती उपायांचा कसा वापर करू शकतो . ते माहिती घेऊया…….

— सांधेदुखी चा त्रास असल्यास दोन चमचे बडीशोप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राहील तो पर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल.

— दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंदमुळाची भरड चार कप पाण्यात उकळावे व एक कप पाणी राहिल्यावर गळून घ्यावे. व पिऊन घ्यावे. हा काढा नियमित घेतल्यास सांधेदुखी मध्ये निश्चित आराम मिळेल.

— निर्गुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सुज व वेदना कमी होतात.

— मूठभर ओवा एरंडतेल तव्यावर गरम करून सुती कापडात बांधून पोटली करावी व त्याने दुखणारा सांधा शेकावा.

— एरंडची पाने वाफवून कुटून दुखत असलेल्या सांध्यावर बांधावे.

— रोजची कनिक मळताना चमचाभर एरंड तेलाचे मोहन घालून केलेली पोळी किंवा फुलका खावा. याने सांधेदुखीचा व सर्व सांधे संबंधित समस्या दूर होतात.

— सांधे दुखत असल्यास मेथीचे व डिंकाचे लाडू नियमित खाल्ल्यास फायदा होतो.

—- रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये, वजन जास्त असल्यास कमी करावे, नियमित योगासने करावी, व सकाळी चालायला जावे. असे केल्यास सांधे दुखीचा त्रास होत नाही.
— तीळ व आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले तेल नियमित लावल्यास व आहारामध्ये योग्य प्रमाणात साजूक तूप समाविष्ट केल्यास शरीराचे स्नान होऊन सांधेदुखी कमी होते.

— शरीराची मालिश केल्याने सुद्धा तुमच्या सांधेदुखीचा त्रास हा कमी कमी होऊ शकतो.