नाभीत तेल घालून झोपल्याने होतात चमत्कारिक फायदे; माहित नसतील तर जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण लहान असताना आई किंवा आज्जी आपण झोपण्याआधी हलकेच नाभीत तेल सोडायच्या आणि मग आपण गाढ झोपी जायचो. तेव्हा तर इतकं काही कळण्याचं आणि समजण्याचं असं वय नव्हतं. पण आता या गोष्टींचा सारासार अर्थ समजू शकू इतके आपण नक्कीच मोठे झालोय. मुळात रात्री झोपताना नाभी मध्ये तेल घातल्याने अनेको अविश्वसनीय फायदे दिसून येतात. यासाठी वेगवेगळ्या तेलाचा वापर केला जातो. शरीराचे सर्व अवयव नाभीशी जुळलेले असतात. त्यामुळे नाभीत तेल घातल्याने शरीराच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या सोडवता येतात. म्हणून रात्री झोपताना नाभीत तेल घालणे फायद्याचे ठरते. चला तर जाणून घेऊयात नाभीत तेल टाकल्याने शरीरास होणारे फायदे.
१) सर्दी आणि कफ यांचा वारंवार त्रास होत असेल तर कापसाचा गोळा अल्कोहोलमध्ये बुडवून नाभीवर लावावा. हा उपाय सर्दी आणि कफावर अगदी अचूक ठरेल. इतकेच काय तर, यामुळे जुनाट सर्दी आणि कफसुद्धा लगेच बरा होतो.
२) नारळाचे तेल किंवा ऑलीव्ह ओईलचे काही थेंब नाभीवर लावून हळूवार मसाज केल्याने संतती निगडीत सर्व समस्या दूर होतात. शिवाय प्रजनन क्षमताही वाढते.
३) जर डोळ्यांशी निगडित कोणतीही समस्या जाणवत असेल तर नाभीवर नारळाचे तेल चोळावे. यामुळे डोळ्याची दृष्टी सुधारते आणि चांगली राहते.
४) केस गळतीच्या समस्यसाठी मोहरीचे तेल नियमितपणे नाभीवर लावून मालिश करावी. यामुळे केस गळणे लगेच कमी होते आणि केस मजबूतसुद्धा होतात.
५) मासिक पाळीमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीवेळी होणाऱ्या या समस्यांपासून वाचण्यासाठी कापसाचा गोळा ब्रँडीमध्ये भिजवून नाभीवर ठेवल्याने लगेच फरक जाणवतो आणि या समस्यापासून मुक्ती मिळते.
६) सांधेदुखी किंवा ओठ फुटण्याची समस्या असेल तर मोहरीच्या तेलाचा वापर करा. यासाठी नाभीमध्ये रात्री झोपण्याआधी राईच्या तेलाचे काही थेंब टाकावे.
७) गुडघेदुखीची समस्या असेल तर नाभीवर मोहरीचे तेल लावावे किंवा २ थेंब घालावे. यामुळे सांधे व गुडघेदुखीपासून आराम मिळतो.
८) आपला चेहरा डागरहीत किंवा सुंदर हवा असेल, तर बदाम तेलाचे काही थेंब नाभीमध्ये घातल्यामुळे किंवा मॉलिश केल्याने चेहरा उजळतो आणि तेज येते.
९) त्वचा रुक्ष आणि कोरडी झाली असेल आणि मऊ करायची असेल तर गायीचे तूप नाभीवर लावावे, यामुळे त्वचेचा कोरडेपणा निघून जातो.
१०) मुरुमाच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर कडुलिंबाचे तेल नाभीत टाका. शिवाय ग्रस्त भागावर मसाज करा. यामुळे मुरूम आणि पुरळं येणे बंद होते आणि त्वचा डागरहित आणि सुंदर होते.