Argan Oil
| |

Argan Oil करते UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण; जाणून घ्या 8 प्रमुख फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Argan Oil) एप्रिल महिन्याचा मध्यान्ह म्हणजे शास्त्रशुद्ध कडक उन्हाळा. या दिवसात सूर्याचे मस्तक इतके गरम असते कि, त्याच्या संतापाची किरणे मानवी जीवनावर गंभीर परिणाम करतात. यामुळे शारीरिक आरोग्यविषयक समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. तर त्वचेच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सूर्य किरणांच्या प्रभावामुळे त्वचेच्या लेयर्सचे पूर्ण नुकसान होते. यामुळे अचानक शरीरावर टॅनिंग होते. अर्धे शरीर सामान्य रंगाचे आणि बाकी ज्यावर किरणांचा मारा होतो तो भाग पूर्ण काळा होऊन जातो.

सध्या पाहिलं तर, ऊन वाढतंच चाललं आहे. शिवाय येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असता आपल्या त्वचेचे या उन्हापासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी पुरेसे पाणी पिणे, आहारात बदल करणे यासोबत त्वचेच्या काळजीसाठी काही विशेष तेलांचा वापर करणे फायद्याचे ठरते. या तेलांमध्ये आर्गन ऑईलचा समावेश आहे. आर्गन ऑईल हे सूर्याच्या अतिशय त्रासदायक अशा UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यात प्रभावी मानले जाते. (Argan Oil)

Argan Oil
Argan Oil

आर्गन ऑईलच्या वापरामुळे चेहऱ्याची त्वचा मऊ, डागरहित आणि निरोगी राहते. तसेच आर्गन ऑइलमध्ये अधिक फॅटी ऍसिड, अँटि ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि दाहक- विरोधी गुणधर्म असतात. जे आपल्या मानवी त्वचेसाठी अतिशय लाभदायी ठरतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा त्वचा कोरडी होत नाही. उलट आपली त्वचा अतिशय मऊ होते. शिवाय चेहऱ्यावर पिंपल येण्याचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात कमी होते. म्हणुनच आज आपण या विशेष लेखातून त्वचेसाठी आर्गन ऑइल कसे फायदेशीर आहे ते जाणून घेणार आहोत.

० त्वचेवर आर्गन ऑइल लावण्याचे फायदे (Argan Oil)

१) सूर्याच्या UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते –

Summer Skin Care Tips

उन्हाळ्यात सर्वाधिक त्रास सूर्याच्या अतितीव्र अशा UV किरणांचा होतो. या किरणांचा मारा थेट चेहऱ्यावर झाल्यास डाग, पुरळ, चट्टे आणि अगदी स्किन बर्न होण्याची शक्यता असते. परंतु, आर्गन ऑइलमध्ये असलेले व्हिटॅमिन ई सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे होणारे नुकसान थांबवू शकते. म्हणून कडक उन्हाळ्याच्या दिवसात आर्गन ऑईलचा त्वचेवर वापर करावा.

२) त्वचेला आर्द्रता मिळते –

उन्हाळ्यात त्वचेला आर्द्रतेची अत्यंत गरज असते. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा दूर राहतो. मात्र उन्हाळ्यातील तापमान आणि सूर्य किरणांमुळे त्वचेतील आद्रता कमी कमी होत जाते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. अशावेळी चेहऱ्यावर आर्गन ऑइल लावल्याने त्वचेला ओमेगा- 3 फॅटी अॅसिड मिळतं. ज्यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा पूर्णपणे दूर होतो आणि त्वचा मुलायम होते. (Argan Oil)

Skin

३) त्वचेवरील डाग निघून जातात –

जर तुमच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल किंवा वृद्धत्वामुळे खड्डे आणि डाग पडत असतील तर यासाठी आर्गन ऑइलचा वापर करणे कधीही फायदेशीर. कारण आर्गन ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई असते जे त्वचेसाठी उपयुक्त आहे. यासाठी नियमित रात्री त्वचेवर आर्गन ऑइल लावून मसाज करा.

Summer Skin Care

४) सर्व त्वचेच्या प्रकारांसाठी फायदेशीर –

आपल्या त्वचेचे विविध प्रकार असतात. कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि इतर अनेक. यातील प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी आर्गन ऑइलचा वापर करता येतो. याचे कारण म्हणजे आर्गन ऑइल हे सर्व त्वचेसाठी फायदेशीर आहे. आर्गन ऑईलचा वापरामुळे चेहऱ्यावरचे छिद्र बंद होत नाहीत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची त्वचा असुदे हे तेल वापरण्याजोगे आहे. (Argan Oil)

५) अकाली वृद्धत्वविरोधी गुणधर्म –

(Argan Oil) जर तुमच्या चेहऱ्यावर अकाली वृद्धत्वाची चिन्हे दिसत असतील. जसे की सुरकुत्या, फ्रिकल्स, बारीक रेषा, सैल त्वचा तर तुमचा चेहरा तुमच्या वयापेक्षा फार मोठा दिसू लागतो. यामुळे तुम्ही वृद्ध दिसू लागत. यासाठी आर्गन ऑईलमधील अँटि ऑक्सिडंटस आणि मॉइश्चरायझिंग गूणधर्म तरुण वयात वृद्धत्वापासून संरक्षण करतात.

Beautiful Face

६) त्वचेवरील सूज कमी करण्यात प्रभावी –

आर्गनचे तेल हे आपल्या त्वचेच्या प्रत्येक लेयरला मजबूत करते. यामुळे त्वचेतील मांसपेशींचे होणारे नुकसान थांबते. परिणामी त्वचेवर येणारी सूज कमी होते. अनेकदा सूर्याच्या अति उष्ण किरणांमुळे त्वचेची सर्वात पहिली लेयर सूक्ते. या सुकलेल्या पॅचेसला नरम करण्याचे काम हे तेल करते. शिवाय त्वचेच्या आरोग्याला प्रभावशाली बनवण्यासदेखील हे तेल अतिशय मदत करते.

Acne

७) मुरुमांपासून सुटका मिळेल –

मुरुम असलेल्या त्वचेवर आर्गन ऑइलचा वापर केल्यास मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळते. कारण आर्गन तेल हे एका हिलिंग एजेंटच्या रुपात ही काम करते. या तेलामध्ये अॅंटीइंफ्लेमेंटरी गुण असतात. जे त्वचेवरील सूज कमी करतात आणि चेहऱ्यावरील मुरुम, पिंपल्सच्या प्रभावाला शांत करतात. या तेलामध्ये अॅंटीसीबमचेदेखील गुण मोठ्या प्रमाणात असतात. या उपलब्ध गुणांमुळे त्वचेतील चिकटपणा कमी होते आणि तेलकट त्वचेमध्ये सुधारणा झाल्यामुळे मुरूम येण्याची समस्या दूर होते. (Argan Oil)

८) जखम भरण्यासाठी मदत करते –

आर्गन तेलामध्ये अनेक अॅंटी इंफ्लेमेंटरी आणि अॅंटी ऑक्सीडन्ट गुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. हे गुण आपल्या त्वचेवरील आणि त्वचेतील जखमा पूर्णपणे ठीक करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे एखादी जखम झाल्यास सूजसुद्धा आली असेल तर आर्गन ऑइल प्रभावीपणे मदत करते.

‘हे’ पण जरूर वाचा :-

Summer Skin Care उन्हामुळे स्कीन ग्लो कमी झाला..? तर ‘या’ टीप्स जरूर वापरा; जाणून घ्या

Summer Care Tips For Babies उन्हाच्या तीव्रतेपासून बाळाचे करा रक्षण; जाणून घ्या टिप्स