Fasting
| | |

उपवास आहे पण काय खावं कळत नाही?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आज अनेक लोकांचा महाशिवरात्री निमित्त कडक उपवास असेल. पण आरोग्याचा नियम काय सांगतो? कि उपवास असला तरीही पोट रिकामी ठेवायचं नाही. त्यामुळे काही ना काही खावं तर लागेलच. पण काय खाऊ कळत नाही..? मग फार विचार करूच नका. कारण असे अनेक लोक आहेत ज्यांना उपवासावेळी काय खावं ते कळत नाही. शिवाय उपवासाच्या दिवशी फार मर्यादित पण पोटाला आधार देणारे पदार्थ खायचे असतात. त्यामुळे कन्फ्युजन संपत संपत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा १० गोष्टी सांगणार आहोत ज्या उपवासाच्या दिवशी खाल्ल्याने एकतर तुम्ही उपाशी राहणार नाही आणि दुसरं म्हणजे ते पदार्थ आरोग्यवर्धक असतील.

1. साबुदाण्याची खिचडी बनवून खा. बनवताना साजूक तूप आणि साखरेचा वापर करा. हा पदार्थ अत्यंत चविष्ट आणि हेल्दी ठरेल.

2. दिवसभरात अधून मधून ड्राय फ्रुट्सचे सेवन करा. यामुळे ऊर्जा आणि कॅलरी दोन्ही मिळेल.

3. रताळ्याच्या शिरा, रताळ्याचा किस, भाजी किंवा नुसते रताळे उकडून खाल्ल्यास शरीरास दीर्घकाळापर्यंत ऊर्जा देण्यास मदत करतात.

4. बटाट्याचे चिप्स वा तळलेले कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी, कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ खा. चवीप्रमाणे तिखट किंवा गोड पदार्थ बनवून आस्वाद घ्या.

5. दह्यात कुट्टुचे पीठ, शेंगदाण्याचा कूट आणि बटाटे घालून पातळ आमटीसारखे बनवा. हा पदार्थ अत्यंत चविष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम आहे. यामुळे गॅससारख्या समस्या उदभवणार नाही.

6. कुट्टू वा शिंगाड्याच्या पिठाची पुरी बनवू नका. तर त्याची पोळी बनवून खा. हे जास्त फायदेशीर आहे.

7. उपवासात दही खिचडी, दही थालीपीठ, दही मिसळ असे दह्याचे पदार्थ खा. या पासून शरीराला ऊर्जा मिळेल आणि दही पोटाच्या विकारांना दूर ठेवेल.

8. तेलकट पदार्थ टाळा आणि दूध केळ्याचा मिल्कशेक दिवसातून 2-3 वेळा घ्या. यामुळे भूक लागणार नाही आणि संपूर्ण दिवस ऊर्जा टिकेल.

9. फळांचे किंवा गाजर, काकडी, बिट यांसारख्या भाज्यांचे सॅलड वा कोशिंबीर बनवून खा. चवीसाठी सैंधव मीठ आणि काळी मिरपूड वापरा. यामुळे पोट लवकर भरेल.